ETV Bharat / city

'रुद्रेश्वर' गोमंतकीय भंडारी समाजाचे आराध्य दैवत, प्राचीन लेण्यासह फेसाळणारे धबधबे आकर्षणाचे केंद्र

मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी होणारे प्राचीन लेण्यांचे दर्शन, सतत फेसाळणार बारमाही धबधबा यांमुळे उत्तर गोव्यातील साखळी येथील रूद्रेश्वर मंदिर भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहे. गोव्यातील भंडारी समाजाचे हे आराध्य दैवत आहे. त्यामुळे समाजाच्यावतीने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येथे सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते.

author img

By

Published : Aug 13, 2019, 7:57 AM IST

Updated : Aug 13, 2019, 8:22 AM IST

'रुद्रेश्वर' गोमंतकीय भंडारी समाजाचे आराध्य दैवत

पणजी - उत्तर गोव्यातील साखळी येथील रूद्रेश्वर मंदिर भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी होणारे प्राचीन लेण्यांचे दर्शन, सतत फेसाळणारे बारमाही धबधबा यामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे. गोव्यातील भंडारी समाजाचे हे आराध्य दैवत आहे. त्यामुळे समाजाच्यावतीने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येथे सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते.

गोव्यातील रुद्रेश्वर मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन

गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर डिचोली तालुक्यातील साखळी शहरापासून हाकेच्या अंतरावर हरळवे गाव आहे. विस्ताराने मोठा असलेल्या या गावात एकाच दगडात कोरलेल्या प्राचीन लेण्या आहेत. ज्या आता भारतीय पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहेत. तेथून पुढे गेल्यानंतर 'पांडवकालीन रुद्रेश्वर मंदिर' नावाचा फलक दिसून येतो. हेच महाशिवरात्रीबरोबरच बारमाही तीर्थक्षेत्र म्हणून गोव्यासह, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेले 'रुद्रेश्वर मंदिर ' होय.

कुडणे नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराच्या समोरच उंच असा आकर्षक धबधबा आणि तलाव आहे. जसे भाविकांमध्ये मंदिर आस्थेचे स्थान मिळवून आहे. तसा गोव्यात येणाऱ्या देशीविदेशी पर्यटकांसाठी येथील हरवळे धबधबा मोठे आकर्षक आहे. सध्या पावसाळा असल्याने हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. येथे अनेक चित्रपट आणि अल्बम यांचे चित्रिकरण झाले आहे. अभिनेते कमल हसन यांच्या लोकप्रिय 'एक दूजे के लिए' चित्रपटात याचे दर्शन होते. मंदिरात दर सोमवारी, महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

मंदिराविषयी माहिती देताना रुद्रेश्वर देवस्थान समितीचे सचिव सुभाष किनळेकर म्हणाले, हे प्राचीन आणि स्वयंभू देवस्थान संपूर्ण गोमंतकीय भंडारी समाजाचे आराध्य दैवत आहे. तीर्थक्षेत्र असल्यामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील भाविक येथे येत असतात. येथे अस्थी विसर्जनही केले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवरात्रीप्रमाणेच शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांना थेट शिवलिंगावर अभिषेक करता येतो.

तर गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले, समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास व्हावा, यासाठी मागील १० वर्षे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ५ लाख २८ हजार संख्या असलेल्या समाजाच्यावतीने 'सत्यनारायण महापूजा' केली जाते.

यावर्षी सत्यनारायण पूजेचे यजमानपद दत्तप्रसाद नाईक यांना मिळाले. याचे आनंद व्यक्त करताना सध्याची समाजाची समिती चांगले काम करत आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून समितीला समर्थन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Intro:पणजी : मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी होणारे प्राचीन लेण्यांचे दर्शन, सतत फेसाळणार बारमाही धबधबा यांमुळे उत्तर गोव्यातील साखळी येथील रूद्रेश्वर मंदिर भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहे. गोव्यातील भंडारी समाजाचे हे आराध्य दैवत आहे. त्यामुळे समाजाच्यावतीने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येथे सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते.

Body:गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर डिचोली तालुक्यातील साखळी शहरापासून हाकेच्या अंतरावर हरळवे गाव आहे. विस्ताराने मोठ्य असलेल्या या गावात एकाच दगडात कोरलेल्या प्राचीन लेण्या आहेत. ज्या आता भारतीय पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहेत. तेथून पुढे गेल्यानंतर 'पांडवकालीन रुद्रेश्वर मंदिर' नावाचा फलक दिसून येतो. हेच महाशिवरात्रीबसोबरच बारमाही तीर्थक्षेत्र म्हणून गोव्यासह, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेले 'रुद्रेश्वर मंदिर ' होय. कुडणे नदीच्या काठावर असलेला या मंदिराच्या समोरच उंच असा आकर्षक धबधबा आणि समोर तलाव आहे. जसे भाविकांमध्ये मंदिर आस्थेचे स्थान मिळवून आहे. तसा गोव्यात येणाऱ्या देशीविदेशी पर्यटकांसाठी येथील हरवळे धबधबा मोठे आकर्षक आहे. सध्या पावसाळा असल्याने हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. येथे अनेक चित्रपट आणि अल्बम यांंचे चित्रिकरण झाले आहे. अभिनेते कमल हसन यांच्या लोकप्रिय ' एक दूजे के लिए' चित्रपटात याचे दर्शन होते.
मंदिरात दर सोमवारी, महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
मंदिराविषयी माहिती देताना रुद्रेश्वर देवस्थान समितीचे सचिव सुभाष किनळेकर म्हणाले, हे प्राचीन आणि स्वयंभू देवस्थान संपूर्ण गोमंतकीय भंडारी समाजाचे आराध्य दैवत आहे. तीर्थक्षेत्र असल्यामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकमधीर भाविक येथे येत असतात. येथे अस्थी विसर्जन ही केले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवरात्रीप्रमाणेच शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांना थेट शिवलिंगावर अभिषेक करता येतो.
तर गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले, समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास व्हावा यासाठी मागील 10 वर्षे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 5 लाख 28 हजार संख्या असलेल्या समाजाच्यावतीने ' सत्यनारायण महापूजा ' केली जाते.
यावर्षी सत्यनारायण पूजेचे यजमानपद मिळाल्यामुळे दत्तप्रसाद नाईक यांनी आनंद व्यक्त करताना सध्याची समाजाची समिती चांगले काम करत आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी वैयक्तिक हवेदावे बाजूला ठेवून समितीला समर्थन द्यावे, असे आवाहन केले.

Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 8:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.