ETV Bharat / city

गोव्यात पाच नगरपालिकांसाठी 66.70 टक्के मतदान

author img

By

Published : Apr 23, 2021, 10:52 PM IST

गोव्यात पाच नगरपालिकांसाठी 66.70 टक्के मतदान झाले. यामध्ये 177 कोविड पॉझिटिव्ह मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पणजी
पणजी

पणजी - गोव्यात आज सांगे, केपे, मडगाव, मुरगाव आणि म्हापसा या पाच नगरपालिकांसाठी 66.70 टक्के मतदान झाले. यामध्ये 177 कोविड पॉझिटिव्ह मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारापूर-सरवण आणि वेळ्ळी या दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एका प्रभागासाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये मात्र कोविड पॉझिटिव्ह मतदारांनी मतदान केले नाही.

गोव्यात कोविड संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू करतानाच नगरपालिका निवडणूक नियोजित वेळेत होतील असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज पाचही नगरपालिकांमध्ये मतदान घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आली होती. मतमोजणी सोमवारी (दि. 26) होणार आहे. एकूण 93 प्रभागासाठी 231 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. ज्यामध्ये 1 लाख 23 हजार 546 मतदारांनी हक्क बजावला. ज्यामध्ये 91 हजार 519 पुरुष तर 93 हजाक्ष 706 महिला मतदारांनी मतदान केले.

नगरपालिका आणि मतदान
सांगे- 81.49 टक्के
केपे- 78.01 टक्के
मडगाव - 64.25 टक्के
मुरगाव - 65.04 टक्के
म्हापसा - 68.57 टक्के
ग्रामपंचायत पोटनिवडणूक
कारपूर-सरवण- 85.96 टक्के
वेळ्ळी - 65.59 टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.