ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : उत्पल पर्रिकरांविरोधात एकही उमेदवार उभा करू नका - संजय राऊत

माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर ( Former Goa CM Manohar Parrikar ) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर ( Utpal Parrikar ) यांच्या उमेदवारीवरून सध्या राज्यात चर्चा सुरू आहेत. उत्पल पर्रिकर यांच्याविरोधात एकही उमेदवार देऊ नका, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut Tweet on Utpal Parrikar ) यांनी केले आहे.

Goa Assembly Election 2022
गोवा विधानसभा निवडणूक 2022
author img

By

Published : Jan 17, 2022, 7:32 PM IST

Updated : Jan 17, 2022, 10:49 PM IST

पणजी - माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर ( Former Goa CM Manohar Parrikar ) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर ( Utpal Parrikar ) यांच्या उमेदवारीवरून सध्या राज्यात चर्चा सुरू आहेत. उत्पल पर्रिकर यांच्याविरोधात एकही उमेदवार देऊ नका, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut Tweet on Utpal Parrikar ) यांनी केले आहे. त्याची जाेरदार चर्चा राज्‍यात हाेत आहे.

Goa Assembly Election 2022
संजय राऊत यांनी केलेले ट्विट

'आप'नेही दिली ऑफर -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषदेत बोलताना

दिवंगत मनोहर पर्रीकर यावेळी त्यांच्या समर्थनार्थ संजय राऊत यांनी भाजप विरोधातील सर्व पक्षांना उत्पल यांच्याविरोधात उमेदवारी न देण्याचे आवाहन केले आहे. राऊत यांनी उत्पल यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे आवाहनही केले होते. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उत्पल यांना आपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.

तर मी माझी जागा सोडेन -

उत्पल पर्रिकर याने आम आदमी पक्षात प्रवेश केला तर त्याच्यासाठी मी माझी उमेदवारी त्याला देईन व उत्पल साठी काम करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे पणजीचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी सांगितले. वाल्मिकी यांना आपने नुकतीच पणजी मतदारसंघातून उमेदवारी निश्चित केली आहे.

हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : काँग्रेस सामावून घेईना! शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने गोव्यात लढणार?

काय आहे परिकरांच्या उमेदवारीचा वाद -

केवळ पर्रिकरांचे पुत्र म्हणून उमेदवारी देता येणार नाही, असे विधान भाजपचे गाेवा विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्‍हटले होते. सध्या त्यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार उत्पल यांनी केले असून पणजी मतदारसंघात प्रचारास सुरुवातही केली आहे. पणजीतून उत्पल सोबत स्थानिक आमदार बाबुश मोंसरात भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत. बाबुश मोंसरात यांचे तिसवादी तालुक्यातील पाचही मतदारसंघात समर्थक आमदार आहेत. जर मोंसरात यांना तिकीट नाकारल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो, म्हणूनच भाजपने आधीच सावध पवित्रा घेत मोंसरात यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

Last Updated : Jan 17, 2022, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.