पणजी - उत्तर गोव्यातील पेडणे पोलीस पथकाने अमली पदार्थविरोधी कारवाई केली आहे. यात पोलिसांनी हरमल समुद्र किनाऱ्यावरील पार्किंग भागातून अमलीपदार्थ बाळगणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. प्रदीप रमेश वळेचा (वय 21 वर्ष, कल्याण, मुंबई) आणि सलीम कय्याम खान (वय 21 वर्ष, उल्हासनगर, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा - श्रीधाम एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती, तपास सुरू
स्कुटरवरून फिरणाऱ्या एका व्यक्तीकडून अमलीपदार्थाची देवाणघेवाण होत असल्याची गुप्त माहिती पेडणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस पथकाने हरमल समुद्र किनाऱ्यावरील पार्किंग भागात संशयितांचा शोध सुरू केला. या दरम्यान पथकाने प्रदीप रमेश वळेचा व सलीम कय्याम खान याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्कुटरच्या (क्र. ०१ एन ५२३०) कप्प्यात लपवून ठेवलेला सुमारे 69 हजार किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल गिरी, कॉन्स्टेबल विनोद पेडणेकर, शैलेश पेडणेकर आणि रवी म्हालोजी यांनी केली.
हेही वाचा - काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकेवर चार जानेवारीला होणार सुनावणी