ETV Bharat / city

गोव्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका; दोघांचा मृत्यू, २०० घरांचे नुकसान

author img

By

Published : May 16, 2021, 8:30 PM IST

गोव्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. गोव्यात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे असून ५०० हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुमारे १०० घरांचे मोठे आणि १०० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर, वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

Home damage Goa tauktae cyclone
तौक्ते चक्रीवादळ मोठा फटका गोवा

पणजी (गोवा) - गोव्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. गोव्यात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे असून ५०० हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुमारे १०० घरांचे मोठे आणि १०० घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर, वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

पावसाचे दृश्य

हेही वाचा - कोरोना : ग्रामीण अन् अदिवासी भागातील व्यवस्थापनासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

पणजीत १०८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. ४ नंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी वाऱ्याचा वेग कायम आहे. चक्रीवादळ पणजीपासून अवघ्या १००.६ कि.मी अंतरावरून गेले. सगळीकडे वाऱ्याचा जोर कायम आहे. पावसाचा जोर ओसरत आहे, पण काही काळाने पाऊस पुन्हा जोर धरेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. राज्यात झाडे, वीजखांब कोसल्याच्या १५० हून अधिक घटना आहे, पण प्रत्येक ठिकाणी पोहचण्यास अग्निशामक दलाला शक्य नसल्याने हतबलता आहे.

गोव्यात पावसाचा कहर

गोव्यातील पेडणे येथे ७५ मि.मी पावसाची नोंद झाली. जुन्या गोव्यात ८८.५ मि.मी, म्हापसा १११.५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौक्ते वादळ निर्माण होऊन ते किनारपट्टीवर धडकण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. अखेर आज हे चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टी भागावर धडकले असून, आज सकाळपासूनच या वादळाचे परिणाम दिसायला सुरुवात झाली होती.

पणजीत ६० ठिकाणी झाडे, घरे कोसळली

चक्रीवादळाने राज्यात सगळीकडेच कहर मांडला आहे. पणजी शहरात आतापर्यंत ६० हून अधिक ठिकाणी झाडे, घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ सुदैवाने आतापर्यंत राज्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही. शनिवारी सायंकाळपासून राज्याला पावसाने तडाखा दिला आहे. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ६० हून अधिक ठिकाणी घरांवर, वाहनांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी घरे, शासकीय आस्थापनांवरील छत वाऱ्याने उडून गेले. पावसाचा जोर कायम असल्याने दैनंदिन व्यवहार सकाळपासून ठप्प आहेत. कदंबा बसस्थानकाच्या इमारतीवरील पत्रेदेखील उडून गेल्याची घटना घडली. एकाचवेळी अनेक ठिकाणी अशा घटना घडत असल्याने अग्निशामक दल हतबल झाले आहे. तरीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Home damage Goa tauktae cyclone
झाड कोसळल्याचे दृश्य

हेही वाचा - भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन लस प्रभावी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.