ETV Bharat / city

पर्यटनपुरक नवे व्यवसाय गोव्यात आणणार : सुरेश प्रभू - लोकसभा

केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू हे मंगळवारी पर्वरी येथे भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

सुरेश प्रभू
author img

By

Published : Apr 17, 2019, 8:53 AM IST

Updated : Apr 17, 2019, 11:56 AM IST

पणजी - पर्यटनाचा विचार करून खाण व्यवसाय सुरू करण्याचा विचार झाला पाहिजे. त्याबरोबर गोव्यात असे उद्योग स्थापन केले गेले पाहिजेत की, ज्याचा फायदा मच्छीमारांनाही झाला पाहिजे, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी पर्वरी येथे दिले. ते भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचार सभेत बोलताना सुरेश प्रभू

प्रभू म्हणाले, मागील अनेक वर्षे केंद्रात मंत्री असल्यामुळे पर्यटनाच्या आधारे खाण व्यवसाय कसा सुरू करता येईल, याची जगभरातून माहिती गोळा केली आहे. खाणींची गरज आहे, त्यापेक्षा पर्यावरणाची गरज आहे. पर्यावरणाला हानी न पोहचविता खाण व्यवसाय कसा सुरू करता येईल, याचा विचार केला जात आहे. तसेच गोव्यात मच्छीमारांना फायदा होईल, अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी यासाठी चीन, कोरिया यासारख्या देशांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. गोव्यातील महिला, मच्छीमारांना चांगले दिवस येण्यासाठी भाजपला निवडून दिले पाहिजे.

नागरिकांना घरबसल्या त्यांचे अधिकार देण्याची भाजपची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची नव्याने जगाला ओळख झाली आहे. त्यामुळे त्यांनी मागील पाच वर्षांत सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडणून द्यावे लागेल, असे सांगून प्रभू म्हणाले, मोदी यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मागील पाच वर्षात देशभरात एकही दहशतवादी हल्ला होऊ शकला नाही. तत्पूर्वी घरातून बाहेर पडण्याची भीती वाटत असे.

उत्तर गोवा भाजप उमेदवार श्रीपाद नाईक म्हणाले, मतदारांनी विरोधकांच्या टीकेकडे दूर्लक्ष केले तर अधिक चांगले होईल. जर विकास केला नसता तर मतदारांनी पुन्हा-पुन्हा निवडून दिले असते का? विकास करण्यामध्ये कमी पडलो नाही. विकास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही चुकीचे पाऊल उचलले नाही. म्हणून हक्काने मते मागत आहे. भाजपच्या यशाचे श्रेय मतदारांना जाते.

यावेळी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो, माजी आमदार दामोदर नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष सुलक्षणा सावंत, उपाध्यक्ष कुंदा चोडणकर आदी उपस्थित होते.

Intro:पणजी : पर्यटनाच विचार करून खाण व्यवसाय सुरू करण्याचा विचार झाला पाहिजे. त्याबरोबर गोव्यात असे उद्योग स्थापन केले गेले पाहिजे की, ज्याचा फायदा मच्छीमारांनाही झाला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज पर्वरी येथे केले. ते भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

Body:प्रभू म्हणाले, मागील अनेक वर्षे केंद्रात मंत्री असल्यामुळे पर्यटनाच्या आधारे खाण व्यवसाय कसा सुरू करता येईल याची जगभरातून माहिती गोळा केली आहे. खाणींची गरज आहे, त्यापेक्षा पर्यावरणाची गरज आहे. पर्यावरणाला हानी न पोहचविता खाण व्यवसाय कसा सुरु करता येईल याचा विचार केला जात आहे. तसेच गोव्यात मच्छीमारांना फायदा होईल, असे अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी यासाठी चीन, कोरिया यासारख्या देशांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. गोव्यातील महिला, मच्छीमारांना चांगले दिवस येण्यासाठी भाजपला निवडून दिले पाहिजे.
नागरिकांना घरबसल्या त्यांचे अधिकार देण्याची भाजपची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची नव्याने जगाला ऐळख झाली आहे. त्यामुळे त्यांनी मागील पाच वर्षांत सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडणून द्यावे लागेल, असे सांगून प्रभू म्हणाले, मोदी यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मागील पाच वर्षात देशभरात एकही दहशतवादी हल्ला होऊ शकला नाही. तत्पूर्वी घरातून बाहेर पडण्याची भीती वाटत असे.
उत्तर गोवा भाजप उमेदवार श्रीपाद नाईक म्हणाले, मतदारांनी विरोधकांच्या टीकेकडे दूर्लक्ष केले तय अधिक चांगले होईल. जर विकास केला नसता तर मतदारांनी पुन्हा-पुन्हा निवडून दिले असते का? विकास करण्यामध्ये कमी पडलो नाही. विकास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही चुकीचे पाऊस उचलले नाही. म्हणून हक्काने मते मागत आहे. भाजपच्या यशाचे श्रेय मतदारांना जाते.
यावेळी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो, माजी आमदार दामोदर नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष सुलक्षणा सावंत, उपाध्यक्ष कुंदा चोडणकर आदी उपस्थित होते.

Conclusion:
Last Updated : Apr 17, 2019, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.