ETV Bharat / city

'म्हादईसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी'

म्हादई नदी वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यानी डॉ प्रमोद सावंत यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेत पंतप्रधानंची भेट घ्यावी असे पणजीतील मगो पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत सुदिन ढवळीकर म्हणाले.

sudhin-dhavalikar-said-cm-meet-the-prime-minister-along-with-all-party-delegation-for-mhadei
म्हादईसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी - सुदिन ढवळीकर
author img

By

Published : Feb 28, 2020, 9:04 PM IST

पणजी - 'म्हादई' नदी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेत थेट पंतप्रधानांची भेट घ्यावी. यावेळी आम्हाला बोलण्यास अथवा आमचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आज केली आहे.

म्हादईसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी - सुदिन ढवळीकर

पणजीतील मगो पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ढवळीकर म्हणाले केंद्राने म्हादईचे पाणी वळवण्याबाबत दिलेल्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडे गाव सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडले आहे, की गोव्याच्या मुख्यंत्र्याचंचे तिथे कोणी ऐकत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकार म्हादई आईहून मोठी असल्याचे सांगते. मात्र, त्यादृष्टीने काम काहीच करत नसल्याचे दिसते. विरोधी पक्षानी याबाबत सरकाने श्वेतपत्रिका काढावी अशी एकमुखी मागणी केली होती. मात्र, सरकारने ती धूडकावून लावली . विद्यामान मुख्यमंत्री जेव्हा सभापती होते तेव्हा खरे बोलले होते. मात्र, आता ते कोणाच्या दबावाखाली बोलतात हे दिसत नाही. यामुळे गोवा सरकारने म्हादईवर श्वेतपत्रिका काढून १९७३ पासून यावर आतापर्यंत कोणी काय काय केले हो जनतेसमोर ठेवावे.

आमचे केंद्रातील मंत्री, खासदार आणि राज्य सरकारमधील मंत्री काम करत नाहीत हे खरे आहे, असे सांगून ढवळीकर म्हणाले, त्यांच्याकडून गोव्याच्या हिताचे रक्षण होत नसेल तर त्यांनी लोकांना तसे सांगावे. सरकारच्या या दुर्लक्षाला लोकांनी होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या विषयी ढवळीकरांनी सरकारवरून टीका केली. जिल्हा पंचायत निवडणुकीत मगो पक्ष 20 जागा लढवणार आहे, असे सुतोवाच त्यांनी केले. मात्र, या जागा नेमक्या कोणत्या हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. समविचारी पक्षासोबत जाण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.