ETV Bharat / city

पणजी विधानसभा पोटनिवडणूक : सुभाष वेलिंगकरांचा शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल

स्वच्छ राजकारण करण्याची सुरुवात पणजीतून होणार आहे. त्यामुळे १०० टक्के यशाची खात्री असल्याचे सुभाष वेलिंगकरांंनी सांगितले.

author img

By

Published : Apr 29, 2019, 6:19 PM IST

सुभाष वेलिंगकर

पणजी - पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी गोवा सुरक्षा मंचचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

वेलिंगकर यांनी उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी तथा पणजी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज दाखल केल्यानंतर वेलिंगकर म्हणाले, पणजीची ही पोटनिवडणूक गोव्यासाठी महत्त्वाची असून स्थानिक राजकारणाला दिशा देणारी आहे. स्वच्छ राजकारण करण्याची सुरुवात पणजीतून होणार आहे. १०० टक्के यशाची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

सुभाष वेलिंगकर

मागील २५ वर्षांत पहिल्यांदाच शेवटच्या क्षणी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. यामागील कारण काय असे विचारले असता वेलिंगकर म्हणाले, भाजपच्या सुरुवातीच्या म्हणजे उभारणीच्या काळापासून पणजीतील खाचखळगे मला माहित आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढविणार असल्याने नवखा उमेदवार देऊ नये, असे कदाचित भाजपला वाटले असेल.भाजप आणि काँग्रेस हे प्रतिस्पर्धी नसून ती एकच प्रवृत्ती आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, अनैतिकता यांनी बरबटलेल्या या प्रवृत्ती विरोधात लढा असल्याचे वेलिंगकर म्हणाले.

Intro:पणजी : पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी गोवा सुरक्षा मंचचे नेते सुभाइ वलिंगकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

Body:आज सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेत वेलिंगकर उत्तर गोवा.उपजिल्हाधिकारी तथा पणजी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला..
अर्ज दाखर केल्यानंतर वेलिंगकर म्हणाले, पणजीची ही पोटनिवडणूक गोव्यासाठी महत्त्वाची असून स्थानिक राजकारणाला दिशा देणारी आहे. स्वच्छ राजकारण करण्याची सुरुवात पणजीतून होईल. मला 100 टक्के यशाची खात्री आहे.
भाजपने उमेदवारी जाहीर करण्यासाठी मागील 25 वर्षांत पहिल्यांदाच अधिक वेळी घेऊन शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली याचे कारण काय असेल, असे विचारले असता वेलिंगकर म्हणाले, भाजपच्या सुरुवातीच्या म्हणजे उभारणीच्या काळापासून पणजीतील खाचाखळगे मला माहित आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणार असल्याने नवखा उमेदवार देऊ नये असे कदाचित भाजपला वाटले असेल.
पणजीतील मतदार आपल्याला मत देतील याची खात्री आहे , असे सांगून वेलिंगकर म्हणाले, संघपरिवाराची सोबत असूनही 2012 नंतर झालेल्या निवडणुकीत पणजीचे तत्कालीन भाजप उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या लोकप्रियतेत सातत्याने घट होत गेलेली दिसते. त्यामुळे त्यांना मिळणारे मताधिक्य घटत गेले. तसेच भाजप आणि काँग्रेस हे प्रतिस्पर्धी नसून ती एकच प्रव्रूत्ती आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, अनैतिकता यांनी बरबटलेल्या या प्रवूत्ती विरोधात आमचा लढा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.