पणजी - बहुचर्चीत राफेल लढाऊ विमान मंगळवारी भारतीय वायुदलाला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी फ्रांसमध्ये जाऊन भारताच्या पहिल्या राफेल विमानाचे पूजन केले होते. त्यामुळे वायूदलाची ताकद वाढली असून यापुढे शत्रुला विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - देशांतर्गत विमान प्रवासावर 'विस्तारा'कडून ऑफर; ४८ तासात करावी लागणार बुकिंग
पणजीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाईक आले होते. यावेळी त्यांनी राफेलवर आपले मत व्यक्त केले. नाईक म्हणाले, वायू सेना दिनादिवशीच भारताला पहिले राफेल मिळाले हा चांगला योगायोग जुळून आला. एकूण ३६ एअरक्राफ्ट खरेदी केली जाणार आहेत. त्याच्या निर्मितीसाठी वेळ लागतो तो नेमका सांगता येत नाही. जर वेगाने निर्मिती झाली तर वर्षात एक किंवा दोन राफेल भारताला मिळणार आहेत.
हेही वाचा - देशमुख बंधू काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात ठरू शकतात प्रभावशाली?