ETV Bharat / city

Goa Assembly Election Result 2022 : गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा; 'नोटा'पेक्षाही कमी मते

पाच राज्यांचे निकाल हाती आली आहेत. त्यामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. तर गोव्यात ( Goa Assembly Election Result 2022 ) शिवसेना आणि राष्ट्रवादीला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली ( Shivsena Ncp Votes Less Than Nota ) आहे.

Shivsena Ncp Votes Less Than Nota
Shivsena Ncp Votes Less Than Nota
author img

By

Published : Mar 11, 2022, 1:35 PM IST

पणजी - पाच राज्यांच्या निवडणुकीपैकी चार राज्यात भाजपाला प्रचंड यश मिळाले आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात मोठी निराशा पडली ( Goa Assembly Election Result 2022 ) आहे. शिवसेनेला गोव्यात केवळ ०.२ टक्के मते मिळाली आहेत. तर शिवसेनेसोबतच गोव्यात निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही केवळ १ टक्का मते मिळाली ( Shivsena Ncp Votes Less Than Nota ) आहेत. दोन्ही पक्षांपेक्षा गोव्यात नोटाला १.१३ टक्के मते मिळाली आहे.

गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणूक लढवली होती. तसेच, शिवसेनेकडून भाजपा आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडण्यात आली होती. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांचीही गोव्यात मोठी प्रचारसभा झाली होती. मात्र, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आला नाही. गोव्यातील एकाही मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळाली नाही. शिवसेनेला एकूण मतदानापैंकी केवळ ०.२ टक्के मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या खात्यात १.११ टक्के मते मिळाली आहे.

माहिती देताना प्रतिनिधी

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची नीती आहे, असा आरोप केला होता. तसेच, भाजपाला बहुमत मिळणार नसल्याचेही म्हटलं होते. कसिनो आणि गोव्यातील गुन्हेगारी वरून त्यांनी भाजपाला लक्ष केले होते. गोव्यातील सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेच्या सोबत कोणीच आले नाही, तर स्वबळाची देखील तयारी राऊत यांनी दर्शवली होती. मात्र, गोवेकरांनी शिवसेनेला पूर्णतः नाकारले आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांना गोव्यात मिळालेली मते

  • हळदोणा - गोविंद गोवेकर (३४२)
  • कुडतरी - भक्ती खडपकर (५५)
  • मांद्रे - बबली नाईक (११६)
  • म्हापसा - जितेश कामत (१२३)
  • पेडणे - सुभाषकेरकर (२२३)
  • पर्ये - गुरुदास गावकर (२६७)
  • केपे - ऍलेक्सी फर्नाडिस (६६)
  • साखळी - सागर धारगळकर (९७)
  • शिवोली - करिष्मा फर्नाडिस (१६६)
  • वाळपई - देवीदास गावकर (१८३)
  • वास्को - मारुती शिरगावकर (४९)

हेही वाचा - Devendra Fadanvis Statment On BMC Corruption : 'आता मुंबई भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायची आहे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.