ETV Bharat / city

Shiv Sena Support to Utpal Parrikar : शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा; पणजीमधून घेतला उमेदवार मागे, राऊत म्हणाले... - Shiv Sena dropped candidate from panaji

शिवसेनेने पणजी मतदारसंघातून आपला उमेदवार मागे घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना आपला पाठिंबा दर्शविला ( Shiv Sena support to Utpal Parrikar ) आहे.

Shiv Sena Support to Utpal Parrikar
शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा
author img

By

Published : Jan 31, 2022, 5:49 PM IST

Updated : Jan 31, 2022, 6:06 PM IST

पणजी (गोवा) - शिवसेनेने पणजी मतदारसंघातून आपला उमेदवार मागे घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना आपला पाठिंबा दर्शविला ( Shiv Sena support to Utpal Parrikar ) आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे पत्रकार परिषदेत माहिती देताना

हॉटेल मैरियट संजय राऊत आणि उत्पल पर्रीकर यांची भेट -

शिवसेनेने पणजी मतदारसंघातून आपला उमेदवार मागे घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. मोदी-शहा हे बलात्कारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात, मात्र शिवसेना नेहमीच सत्याच्या बाजूने उभी राहिली आणि शिवसेनेने दिलेला शब्द पाळला अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान संजय राऊत आणि उत्पल पर्रीकर यांची हॉटेल मैरियट येथे एक गुप्त बैठक देखील झाली. याविषयी राऊत यांना विचारले असता त्यांनी नो कॉमेंट असे सांगितले.

'हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही' -

“आम्ही आमचा शब्द पाळत आहोत. शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे. पण हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही आहे, असे आमचे मत आहे,” असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत भेटीनंतर म्हणाले -

उत्पल पर्रीकर यांनी आज हॉटेल मैरियट येथे संजय राऊत यांची भेट घेतली. जे जे मला पणजीत साथ देतील त्यांच्या मी भेटीगाठी घेणार. मात्र भेटीविषयी त्यांनी अधिक बोलणे टाळले. शिवसेनेने नुकताच आपला पणजीतील उमेदवार मागे घेतला आहे.

हेही वाचा - Union Budget 2022 : कसा तयार होतो दर वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प? जाणून घ्या विशेष लेखात...

Last Updated : Jan 31, 2022, 6:06 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.