गोवा - शिवसेनेचे बंडखोर आमदार (shiv sena Rebel MLA ) संध्याकाळी एका विशेष विमानाने गोव्यात दाखल ( Arriving by special plane ) होणार आहेत. गोव्यात दाखल झाल्यानंतर पणजी येथील ताज रिसॉर्ट अँड कन्वेंशन सेंटर या हॉटेललात ( Taj Convention Hotel ) या सर्व बंडखोर आमदारांचे (Rebel MLA )राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यानिमित्ताने हॉटेल परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस तसेच हॉटेल प्रशासन प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करत आहेत. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी यांनी सुरक्षेचा आढावा घेतला असून गोवा पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. परिसरात पोलिसांनी भरारी पथके तैनात केली आहेत. वाहनाची कसून चौकशी केली जात आहे.