ETV Bharat / city

सध्या गोव्यात सत्तांतर म्हणजे दिवा स्वप्नच - प्रभाकर ढगे

दोन दशकांत पक्ष संघटनेचा पायाही न बनवू शकलेल्या शिवसेनेचे सत्तांतराचे विचार म्हणजे एक दिवास्वप्नच आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी व्यक्त केले.

प्रभाकर ढगे
ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे
author img

By

Published : Nov 30, 2019, 7:56 AM IST

Updated : Nov 30, 2019, 8:13 AM IST

पणजी - डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 28 सदस्यांचे सरकार गोव्यात भक्कमपणे चालत आहे. त्यामध्ये काँग्रेसमधून आलेल्या मोठ्या गटाचा समावेश आहे, असे असताना हे सरकार अस्थिर आहे म्हणणे म्हणजे एक राजकीय विनोद आहे. दोन दशकांत पक्ष संघटनेचा पायाही न बनवू शकलेल्या शिवसेनेचे सत्तांतराचे विचार म्हणजे एक दिवास्वप्नच आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.

बोलताना प्रभाकर ढगे

गुरुवारी महाराष्ट्रात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातही राजकीय भूकंप होणार, असे वक्तव्य केले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ढगे म्हणाले, महाराष्ट्रात 36 दिवसानंतर सत्तानाट्य घडले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात आले. या पार्श्वभूमीवर गोव्यात काही करता येईल याबाबत चाचपणी करताना काही लोक दिसतात. यामध्ये गोवा फॉरवर्ड अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार विजय सरदेसाई यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी गोव्यातही असंतोष असून सत्तांतर घडणार, असे कुठल्या जोरावर म्हटले काही कळत नाही. गोवा आणि महाराष्ट्रातील राजकीय प्रवृत्ती आणि प्रकृती मोठे अंतर आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली 28 सदस्यांचे भाजप सरकार आहे. यामध्ये काँग्रेसमधून आलेल्या मोठ्या गटाचाही समावेश आहे, असे सांगून ढगे म्हणाले, असे असताना गोव्यात सरकार अस्थिर आहे, असे म्हणणे हा एक राजकीय विनोद आहे. दोन दशकांपासून सेनेचा एक आमदार निवडून आलेला नाही, असे असताना गोव्यात आमचे सरकार येणार म्हणणे म्हणजे शिवसेनेचा एक दिवास्वप्न आहे.

गोव्यात म्हादई पाणी वापटावरून सध्या आक्रोश सुरू आहे. हे प्रकरण सरकारने व्यवस्थित हाताळले नाही तर सरकार अस्थिर करणारी एखादी घटना घडू शकेल. मात्र, ती सत्तांतरापर्यंत जाईल, असे आजच्या स्थितीवरून तरी वाटत नाही, असेही ढगे म्हणाले.

Intro:पणजी : डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 28 सदस्यांचे सरकार गोव्यात भक्कमपणे चालत आहे. त्यामध्ये काँग्रेसमधून आलेल्या मोठ्या गटाचा समावेश आहे, असे असताना हे सरकार अस्थिर आहे म्हणणे म्हणजे एक राजकीय विनोद आहे. दोन दशकांत पक्ष संघटनेचा पायाही न बनवू शकलेल्या शिवसेनेने सत्तांतराचे स्वप्न बघणे धाडसाचे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

Body:गुरूवारी महाराष्ट्रात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातही राजकीय भूकंप होणार असे वक्तव्य केले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ढगे म्हणाले, महाराष्ट्रात 36 दिवसानंतर सत्तानाट्य घडले. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात आले. या पार्श्वभूमीवर गोव्यात काही करता येईल याबाबत आज चाचपणी करताना काही लोक दिसतात. यामध्ये गोवा फॉरवर्ड अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार विजय सरदेसाई यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी गोव्यातही असंतोष असून सत्तांतर घडणार असे कुठल्या जोरावर म्हटले काही कळत नाही. गोवा आणि महाराष्ट्रातील राजकीय प्रव्रूत्ती आणि प्रक्रुती मोठे अंतर आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली 28 सदस्यांचे भाजप सरकार आहे. यामध्ये काँग्रेस मधून आलेल्या मोठ्या गटाचाही समावेश आहे, असे सांगून ढगे म्हणाले, असे असताना गोव्यात सरकार अस्थिर आहे. असे म्हणणे हा एक राजकीय विनोद आहे. कुठलीही तयारी नसताना राणाभिमादेवी थाटात शिवसेनेने गोव्यात आमचे सरकार येणार म्हणणे एक दिवास्वप्न आहे. शिवसेना मागील दोन दशकांत एकही आमदार निवडून आणू शकली नाही किंवा तशी मते घेऊ.शकलेली नाही. ज्या पक्षाचा पाया तयार नाही. त्याने सत्तांतराचे स्वप्न बघणे फार धाडसाचे ठरेल. गोवा फॉरवर्डचे नेते सत्ता स्थापण्यासाठी विधान करत आहेत ते धाडसाचे म्हणावे लागेल.
गोव्यात म्हादई पाणी वापटावरून सध्या आक्रोश सुरू आहे. हे प्रकरण सरकारने व्यवस्थित हाताळले नाही तर सरकार अस्थिर करणारी एखादी घटना घडू शकेल. मात्र, ती सत्तांतरापर्यंत जाईल असे आजच्या स्थितीवरून तरी वाटत नाही, असेही ढगे म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Nov 30, 2019, 8:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.