ETV Bharat / city

उत्तर गोवा: श्रीपाद नाईकांनी राखला गड - Pradeep Padgaonkar

भाजपचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक विजयी झाले आहेत.

उत्तर गोवा मतदार संघाचे उमेदवार
author img

By

Published : May 23, 2019, 6:11 AM IST

Updated : May 24, 2019, 12:00 AM IST

पणजी - उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे श्रीपाद नाईक हे ५ व्यादा विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे गिरीश जोडणकर यांचा ८० हजार २४७ मतांनी पराभव केला आहे. यानिवडणुकीत नाईकांना २ लाख ४४ हजार ८४४ मते मिळाली आहेत. तर दुसरीरकडे चोडणकर यांना १ लाख ६४ हजार ५९७ मते मिळाली आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना श्रीपाद नाईक

या मतदारसंघात तिरंगी लढत होती. येथे भाजप खासदार श्रीपाद नाईक आणि काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांच्यात सरळ लढत झाली. याव्यतिरिक्त आपचे प्रदीप पाडगावकर, रिपाईचे अमीत कोरगावकर, अपक्ष उमेदवार ऐश्वर्या साळगावकर आणि सदानंद कामत यांनीही या निवडणुकीत आपले दंड थोपटल्यामुळे या निवडणुकीत रंगत आली होती.

ठळक घडामोडी:

४.१५ pm - ७वी फेरी: भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना ३६ हजार १८२ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १ लाख २१ हजार ८७ मते मिळाली असून काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना ८४ हजार ९०५ मते मिळाली आहेत.

३.३० pm - भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना ३५ हजार ४८३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १ लाख १९ हजार ७८० मते मिळाली असून काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना ८४ हजार २९७ मते मिळाली आहेत.

२.१५ pm - नाईक यांना ३२ हजार ६२८ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १ लाख १४ हजार ७१ मते मिळाली असून काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना ८१ हजार ४३० मते मिळाली आहेत.

१.३० pm - नाईक यांना २८ हजार ८०४ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १ लाख ६ हजार २३० मते मिळाली असून काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली आहेत.

१२.४० pm - नाईक यांना २१ हजार ५५४ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ८३ हजार ५५६ मते मिळाली असून काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना ६२ हजार ००२ मते मिळाली आहेत.

१२.०० pm - नाईक १६ हजार ७३५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ५७ हजार ७०२ मते मिळाली असून काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना ४० हजार ९६७ मते मिळाली आहेत.

१०.३० am- काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना १९ हजार ७७७ मते मिळाली असून भाजपचे श्रीपाद नाईक यांना २९ हजार ९९८ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीअखेर श्रीपाद नाईक यांना १० हजार २२१ मतांची आघाडी मिळाली आहे.

१०.०० am- काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना १८ हजार २६५ मते मिळाली असून भाजपचे श्रीपाद नाईक यांना २८ हजार ३३३ मते मिळाली आहेत.

९.०० am- भाजपचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. गतवेळी मिळवलेल्या मताधिक्यापेक्षा यावेळी अधिक मताधिक्य मिळेल, व्यक्त केला विश्वास.

८.०० am- उत्तर गोवा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात

७.३० am- उत्तर गोवा मतदारसंघात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्ट्राँगरुम उघडली आहे.

गोवा लोकसभा निवडणूक २०१४ निकाल

भाजपचे श्रीपाद नाईक यांनी २०१४ मध्ये उत्तर गोवा लोकसभा जागेवर विजय मिळवला होता. ६१ वर्षीय नाईक हे ४ वेळा या मतदारसंघातून विजयी झाले असून त्यांनी मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री पद सांभाळले होते. त्यांना आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला होता. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत नाईक यांनी काँग्रेसचे रवी नाईक यांचा १ लाख ५ हजार ५९९ मतांच्या फरकाने पराभव केला होता.

नाईक यांना २ लाख ३७ हजार ९०३ मते मिळाली होती, जी एकूण मतदानाच्या ५९ टक्के होती. त्यावेळी काँग्रेसच्या रवी नाईक यांना १ लाख ३२ हजार ३०४ मते मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण ४ लाख ६ हजार ९४५ मतदान झाले होते (७७.८० टक्के). या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ५ लाख १५ हजार ४४१ आहे, ज्यापैकी महिला मतदारांची संख्या २ लाख ५ हजार ७०१ आहे. पूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोवा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले होते.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. यावेळी पर्रिकरांच्या प्रचार तंत्राचा अभाव निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे यावेळी भाजपला कशा प्रकारे यश मिळते याचा उलगडा थोड्याच वेळात होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 24, 2019, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.