ETV Bharat / city

गोव्यातील सातही कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार, आता एकही रुग्ण नाही

author img

By

Published : Apr 19, 2020, 7:42 PM IST

शेजारील बेळगावमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे दोन्ही सीमांवर कडक तपासणी केली जात आहे. तसेच खलाशांच्या क्वारंटाईनची व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय होणार आहे. खलाशांना कशाप्रकारे येथे आणायचे यावर विचार सुरू आहे.

goa corona update  गोवा कोरोना अपडेट  कोरोनामुक्त गोवा  covid free goa
गोव्यातील सातही कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार, आता एकही रुग्ण नाही

पणजी - गोव्यात सापडलेल्या सातही कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले. सातपैकी सहा जणांना यापूर्वीच डिस्चार्ज देणात आला आहे, तर शेवटच्या रुग्णाची चाचणी आज निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. यासंबंधित गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'महालक्ष्मी' निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. सावंत म्हणाले, कोरोना रुग्ण संख्या सातवरून शून्य झाल्याचा आनंद आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करतो. असे असले तरीही गाफील राहून चालणार नाही. ३ मेपर्यंत गोव्याच्या सीमा बंदच राहणार असून लॉकडाऊनचे पालन करायला हवे. त्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्द काम केल्याने हा परिणाम दिसून येत आहे. आतापर्यंत 2 हजार घरांमध्ये 200 जणांना सरकारी क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर 200 सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. 1000 थर्मलगन खरेदी करण्यात आल्या आहेत, ज्याचा उपयोग सरकारी कार्यालयात केला जाणार आहे.

शेजारील बेळगावमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे दोन्ही सीमांवर कडक तपासणी केली जात आहे. तसेच खलाशांच्या क्वारंटाईनची व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय होणार आहे. खलाशांना कशाप्रकारे येथे आणायचे यावर विचार सुरू आहे. दरम्यान, काही उद्योगांना अटींवर परवानगी दिली असली तरीही 3 मेपर्यंत बाहेरील राज्यातील कर्मचाऱ्यांना आणता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेत्यांकडून अभिनंदन -

गोवा सध्या कोविड-19 मुक्त झाला आहे. यासाठी रात्रंदिवस परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय पथक अभिनंदनास पात्र आहे, असे ट्विट गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले आहे. त्याबरोबरच आता आम्ही जर कोरोना मुक्त असलो तरीही पूर्ण मुक्त नाही. त्यामुळे तपासणी अंतिच पूर्ण सुरक्षित असू, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.