पणजी - राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक ( Goa assembly Election 2022 ) एकत्र लढविणार ( NCP Shiv Sena Alliance in Goa Election ) आहेत, त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड मंगळवारी गोव्यात दाखल ( NCP leader Praful Patel jitendra awhad goa tour ) झाले. मंगळवारी स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या मदतीने लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्यासाठी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी संजय राऊत आज गोव्यात दाखल होणार असून, जागा वाटपाच्या निर्णयावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
'उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारणे हा मनोहर पर्रिकरांचा अपमान'
मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या राजकारणात अनन्यसाधारण योगदान दिले आहेत, ते गोवेकरांचे नेते होते, ते सामान्य गोवेकर होते. त्यामुळे त्यांच्या योगदानाला भाजप विसरली आहे. म्हणूनच आज उत्पल पर्रिकर यांना विधानसभा तिकिटासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही भाजपसाठी फारच दुर्दैवाची वेळ असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
'फडणवीसांना आणि भाजपला आत्मविश्वास नडणार'
देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे, मात्र भाजपने देशभरात अल्पसंख्यांक आणि ख्रिस्ती धर्मियांसाठी केलेल्या विविध घटनांमुळे देशभरात भाजपच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे आगामी विधानसभानिवडणुकीत राज्यातील ख्रिस्ती मतदार भाजपला डावलून विरोधात मतदान करेल याचा फटका भाजपला बसेल असेही आव्हाड यांनी सांगितले.
'काँग्रेस बाजूला जाणे हे दुर्दैव'
महाराष्ट्र राज्यांप्रमाणे गोव्यातही भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी महविकास आघाडी स्थापन करणे गरजेचे होते, मात्र काँग्रेसने वेगळी चूल मांडल्यामुळे हा प्रयोग फसला. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा निर्णय हा दुर्दैवी असल्याचे आव्हाडांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगतले. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काहीही होऊ शकते असेही ते म्हणाले.
हेही वाचा - Goa Assembly Election : आज गोव्यात आप घोषित करणार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार