पणजी (सिंधुदुर्ग) - शिवोली येथे (19 आगस्ट)रोजी एक 34 वर्षीय रसियन महिला मृतावस्थेत आढळून आली होती. एकतेरीना टीतोवा असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, या महिलेचा खून झाला आहे असे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. ही महिला शिवोली येथे भाड्याने राहत असलेल्या घरात तीचा मृतदेह आढळून आला होता.
तिच्या मित्राला अटक
शवविच्छेदन अहवालावर तिचा खून झाल्याचे, समजताच पोलिसांनी तिचा मित्र डेनिस क्रिचकोय या 47 वर्षीय इसमाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात डेनिस हा संशयी आरोपी असून त्याच्याकडे पोलीस कसून तपास करत आहेत.
काय आहे हे प्रकरण?
एकतेरीना तितोवा ही तरुणी लॉकडाउनपासून गोव्यात शिवोली येथे भाड्याने राहत होती. (१९ ऑगस्ट)ला तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता. हणजुण पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवून दिला होता. दरम्यान पोलिसांचा तिचा मित्र डेनिस याच्यावर संशय होता. अखेर, शवविच्छेदन अहवालावर तिचा खून झाला हे समजल्यावर पोलिसांनी डेनिस याला ताब्यात घेतले आहे.
रशियन तरुणीचा खून आणि गोवा पुन्हा चर्चेत
आधीच महिला अत्याचाराच्या घटनांनी गोवा हादरले आहे. बाणावली बलात्कार प्रकरण, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण यांनी गोव्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजत असताना, रशियन तरुणीच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यातली 24 वर्षीय अलेक्झांन्द्रा या तरुणीने लैंगिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली होती. तर, एकतेरीना या 34 वर्षीय तरुणीचा तिच्याच रशियन मित्राने खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे खून व आत्महत्या प्रकारामुळे गोव्याचे नाव सध्या चर्चेत आहे.