गोवा : राज्यात विरोधी पक्षातील काँग्रेसचे गटबाजी उघड ( factionalism of Congress in Goa ) झाली आहे. काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते मायकल लोबो शुक्रवारी मुंबईत दाखल झाले होते. मायकल लोबो काल मुंबई दाखल होऊन त्यांनी भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्याचे ( Michael Lobo met BJP leaders ) बोलले जात आहे तर काँग्रेसने काही आमदारांना सुरक्षेच्या कारणास्तव चेन्नई हलविण्यात आले आहे.
राजकीय घडामोडींना आला वेग : आठवडाभरापासून ऑपरेशन लोटसची तयारी सुरू झाली होती. मात्र, काँग्रेसमधील काही आमदारांनी माघार घेतल्यामुळे हे ऑपरेशन लोटस फेल झाले होते. मात्र, राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो काल मुंबई दाखल होऊन त्यांनी भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. तर भाजपच्या तावडीतून बचाव करण्यासाठी काँग्रेसने आपल्या काही आमदारांना चेन्नईत हलवले आहे.
मायकल लोबोंसह समर्थक आमदार जाण्यास इच्छुक : दरम्यान, काँग्रेसमधीलअंतर्गत गटबाजी उघड झाली असून, मायकल लोबो यांच्यासह त्यांचे पाच समर्थक आमदार भाजपमध्ये जाण्यात इच्छुक आहेत, तर उर्वरित पाच आमदारांना पक्ष सोडायचा नाही आहे. त्यातच सोमवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काँग्रेसने आपल्या पाच आमदारांना चेन्नईला हलविला आहे, तर मायकल लोबो यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार गोव्यात आहेत.
मायकल लोगो मुंबईतून सकाळी परतले गोव्यात : काल संध्याकाळी विधानसभेत कोळशाच्या व थ्रिलिनिअर प्रोजेक्टवरून विरोधकांनी गोंधळ घातला होता. या गोंधळात मायकल लोबो व त्यांची पत्नी दीलियाला लोबो व त्यांचे समर्थक आमदार सहभागी झाले नव्हते. दरम्यान, मायकल लोबो यांनी आपली तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून विधानसभेतून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. तर त्यांच्या पत्नी दिलियाला लोबो यांनीदेखील आपल्या याबद्दल काही माहिती नसल्याचे कारण सांगून काढता पाय घेतला होता. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. मागच्या आठवड्यात काँग्रेसच्या एका गटांनी बंड केला होता त्यांत लोबो हे अग्रस्थानी होते.