पणजी - केंद्र सरकारने ४ मे नंतर देशाच्या ठरावीक भागांमधील दारुच्या दुकानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशानंतर, दुकानांमधला स्टॉक संपण्याची भीती गोव्यातील दुकानदारांनी व्यक्त केली आहे. परदेशी आयातीवरील बंदी कायम राहिल्याने त्यांना ही चिंता सतावते आहे.
मद्यांचे काही प्रकार हे परदेशातून आयत केले जातात. तेव्हा परदेशी आयातीवर बंदी असल्याने राज्यातील दारू साठा लवकरच संपले. तर तब्बल 1300 दुकांनामध्ये दारुचा साठा असून तो काहीच दिवस टिकेल, असे गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी सांगतिले.
दरम्यान गोव्यामध्ये मद्य तयार करण्यात येते. मात्र, त्यासाठीचा कच्चा माल हा उत्तर प्रदेशमधून येतो. मात्र, लॉकडाऊनमुळे कच्चा माल नसल्याने राज्यात मद्य तयार करणेही शक्य नाही, असेही ते म्हणाले.
तसेच मद्य विक्री सुरळीत सुरु झाल्यावर व्यवस्याय 70 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. कारण, राज्यात पर्यटन स्थगित करण्यात आले आहे. गोव्यातील मद्यपान करण्यामध्ये पर्यटकांची संख्या जास्त असते. फक्त 30 पुरवठा स्थानिकांसाठी असतो. पर्यटन पुन्हा सुरू होऊ शकत नसल्यामुळे दारूच्या व्यापाराला वेग येणार नाही, असे नाईक म्हणाले.