पल्लेकेले Sri Lanka won ODI Series against New Zealand After 12 Years : अनुभवी फलंदाजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या जेव्हापासून श्रीलंका क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे, तेव्हापासून श्रीलंका संघाच्या खेळात बरेच बदल झाले आहेत. श्रीलंकेचा संघ एकापाठोपाठ एक मोठे पराक्रम करत आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले इथं खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं रोमहर्षक विजय मिळवला आणि 12 वर्षांपासून असलेली प्रतीक्षाही संपवली.
Sri Lanka claim the series in Pallekele. Michael Bracewell leading the way with the ball with career-best ODI figures of 4-36. The series concludes with the 3rd ODI on Tuesday. Catch up on all scores | https://t.co/3i6hMzXu1t 📲 #SLvNZ #CricketNation #Cricket 📷 = SLC pic.twitter.com/PGB5DCx2As
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 17, 2024
श्रीलंकेचा न्यूझीलंडवर विक्रमी विजय : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ केवळ 45.1 षटकंच खेळू शकला आणि 209 धावा करुन सर्वबाद झाला. यादरम्यान मार्क चॅम्पमॅननं सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याचवेळी मिचेल हेनं 49 धावांचं योगदान दिलं आणि विल यंगनंही 26 धावा केल्या. याच्याशिवाय एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. दुसरीकडे, श्रीलंकेकडून महेश थिक्षणा आणि जेफ्री वँडरसे यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले.
कुसल मेंडिसच्या खेळीनं श्रीलंकेचा विजय : यानंतर 210 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेनं केवळ 163 धावांवर 7 विकेट गमावल्या. अशा स्थितीत हा सामना न्यूझीलंडच्या बाजूनं जाईल असं वाटत होतं. पण कुसल मेंडिसच्या बॅटमधून मॅच विनिंग इनिंग पाहायला मिळाली. त्यानं नाबाद 74 धावा करत संघाला विजयापर्यंत नेलं. त्याचवेळी महेश थिक्षाणानं पलंदाजीतही चमत्कार केला. महेश थिक्षणानं 44 चेंडूत नाबाद 27 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या मालिकेतील पहिला सामनाही श्रीलंकेच्या नावावर होता. अशा स्थितीत श्रीलंकेनं आता मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
Sri Lanka take an unassailable 2-0 lead in the ODI series against New Zealand, powered by Kusal Mendis' unbeaten 74 💪
— ICC (@ICC) November 17, 2024
📝 #SLvNZ: https://t.co/PLx4xLQucR pic.twitter.com/f0mGl3xtPG
श्रीलंकेनं 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली : श्रीलंकेनं 12 वर्षांनंतर न्यूझीलंडचा वनडे मालिकेत पराभव केला आहे. यापूर्वी त्यांनी 2012 मध्ये हा पराक्रम केला होता. त्याचबरोबर श्रीलंकेनं घरच्या मैदानावर सलग सहावी वनडे मालिका जिंकली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या इतिहासात घरच्या मैदानावर सलग 6 मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी श्रीलंकेनं 1997 आणि 2003 मध्ये सलग 5-5 मालिका जिंकल्या होत्या. याशिवाय या वर्षी या मालिकेत एकूण 5 एकदिवसीय मालिका जिंकली आहे, जो एक विक्रम आहे, याआधी श्रीलंकेनं 2014 मध्ये ही कामगिरी केली होती.
हेही वाचा :