ETV Bharat / city

गोव्यात चक्रीवादळामुळे १४६ कोटींचे नुकसान, लॉकडाऊनमध्ये ३१ मेपर्यंत वाढ

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याचे सुमारे १४६ कोटींचे नुकसान झाले आहे. १९९४ नंतर इतके भीषण वादळ प्रथमच गोव्यात आले, चक्रीवादळामुळे राज्यातील वीज, कृषी, शिक्षण तसेच इतर काही सरकारी खात्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या खासगी मालमत्तेची हानी झाली आहे. या हानीची माहिती आपण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला पत्राद्वारे कळवणार आहे. हानीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून निश्चित राज्याला अर्थसहाय्य मिळेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : May 22, 2021, 11:00 AM IST

पणजी (गोवा) - तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याचे सुमारे १४६ कोटींचे नुकसान झाले आहे. तर करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेला राज्यव्यापी कर्फ्यू ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यावेळी त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे सध्या बेकार असल्याने ते सरकारच्या बाबतीत काहीही बोलतात असा आरोपही मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे. ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५ खाटांचा स्वतंत्र विभाग स्थापन केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

१९९४ नंतर इतके भीषण वादळ प्रथमच गोव्यात -

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याचे सुमारे १४६ कोटींचे नुकसान झाले आहे. १९९४ नंतर इतके भीषण वादळ प्रथमच गोव्यात आले, चक्रीवादळामुळे राज्यातील वीज, कृषी, शिक्षण तसेच इतर काही सरकारी खात्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या खासगी मालमत्तेची हानी झाली आहे. या हानीची माहिती आपण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला पत्राद्वारे कळवणार आहे. हानीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून निश्चित राज्याला अर्थसहाय्य मिळेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. दरम्यान, राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला आणखी बळकटी देण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनसुविधांची खरेदी करण्याचा निर्णय शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील काहीच दिवसांत त्यासंदर्भातील प्रक्रियाही पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

राज्यव्यापी कर्फ्यूत ३१ मेपर्यंत वाढ -

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेला राज्यव्यापी कर्फ्यू ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सरकारने ९ मेपासून लागू केलेला १५ दिवसांचा कर्फ्यू येत्या सोमवारी सकाळी संपणार होता. पण राज्यात अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ, प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच कर्फ्यू ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तिसऱ्या लाटेचा सामन्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती व ६० खाटांचा आयसीयू -

सरकारने आतापासूनच तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने आपल्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे. सदस्यांत सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ बाल चिकित्सकांचाही समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती यापुढे वारंवार राज्यातील कोविड स्थितीचा आढावा घेईल आणि सरकारला वेळोवेळी सूचना करेल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर उपचार करण्यासाठी सुपरस्पेशालिटी रुग्नालयात वेगळा ६० खाटांचा आयसीयू विभागही स्थापन करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ब्लॅक फंगस रुग्णांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र विभाग स्थापन -

कोरोनावर मात करण्यासाठी राज्यातील लसीकरणाला गती देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार इतर राज्यांतील नागरिक गोव्यात नोंदणी करून लस घेऊ शकतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर बंदी घालू शकत नाही. पण गोमंतकीय जनतेला लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी आपले पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लवकरच जागतिक निविदाही काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर राज्यात ब्लॅक फंगस अर्थात म्युकोरमायकोसिसचे सहा रुग्ण आढळून आले होते. त्यातील एकाचा ब्लॅक फंगस आणि कोविड अशा दोन्ही आजारांमुळे मृत्यू झालेला आहे. ब्लॅक फंगसची लागण होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र २५ खाटांचा वेगळा विभाग स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

गोवा फॉरवर्डच्या अध्यक्षांना काम नसल्याने आरोपबाजी -

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना काम नसल्याने त्यांच्याकडून आरोपबाजी केली जात आहे. खरे गोंयकारपण काय असते ते आपण त्यांना दाखवले आहे. गोवा भारतातच असल्याने केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे आम्हाला पाळावीच लागतील. त्यांच्या मतानुसार संपूर्ण लॉकडाऊन केला असते तर जीवनावश्यक वस्तू येणेही थांबले असते. त्याचा मोठा परिणाम गोमंतकीयांवर झाला असता. वाहतूक रोखली असती तर परराज्यांतून ये-जा करणारे औषध कंपन्यांचे सुमारे ५ हजार कामगार कसे आले असते? राज्यातील औषध कंपन्या बंद पडल्या असत्या. मी गोव्याच्या हितासाठीच काम करीत आहे. मुख्यमंत्री म्हणून मला सर्वच गोष्टींचा विचार करावा लागतो. असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

हेही वाचा - शेवटच्या क्षणी कमलराज यांना पत्नीसोबत बोलायचं होतं, मात्र बार्ज बुडालं आणि त्यांचा मृत्यू झाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.