ETV Bharat / city

लॉकडाऊननंतर भारतातील पहिले निर्याती जहाज नेदरलँडला रवाना

सोमवारी या जहाजाने गोव्यातून नेरलँडसाठी आपला प्रवास सुरु केला. कोविड-१९ संकटानंतर हे यश गाठणारे आम्ही देशात पहिलेच असल्याचा आनंद असल्याचे चौगुले अ‌ॅण्ड कंपनीचे कार्यकारी संचालक अर्जुन चौगुले म्हणाले.

vessel_exoort
vessel_exoort
author img

By

Published : Dec 16, 2020, 8:10 AM IST

पणजी - कोविड-१९ च्या जागतिक महामारी संकटानंतर गोव्यातील चौगुले शिपयार्ड्स या कंपनीने निर्यात बाजारपेठेत भारतातील पहिल्या वेसल (जहाज) ची यशस्वी निर्यात केल्याची घोषणा केली आहे. 'लेडी हेडविग' नावाचे हे जहाज नेदरलँड्सस्थित 'विजने अ‌ॅण्ड बॅरंड्स' या ग्राहकांसाठी रवाना करण्यात आले आहे. कोविडच्या संकटानंतर हे यश गाठणारे आम्ही देशात पहिलेच असल्याचा आनंद असल्याचे चौगुले अ‌ॅण्ड कंपनीचे कार्यकारी संचालक अर्जुन चौगुले म्हणाले.

कोविडनंतर निर्यात बाजारपेठेत पाठवलेले पहिलेच जहाज-

या वेसलची एकूण लांबी ९८.२ मीटर, रुंदी १३.४ मीटर, खोली ७.८ मीटर आणि ड्राफ्ट ५.६ मीटर एवढा आहे. नेदरलँडमधील ग्राहकांकडून ६ जहाजांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी हे तिसरे जहाज आहे. सोमवारी या जहाजाने गोव्यातून नेरलँडसाठी प्रवास सुरु केला. कोविडनंतर निर्यात बाजारपेठेत पाठवलेले हे पहिलेच जहाज आहे.

ठरलेल्या वेळेआगोदरच वेसलची बांधणी -

जागतिक संकटातही जहाजाच्या निर्यातीवर परिणाम होणार नाही, यासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. कोविड-१९ मधील नियमांमुळे ओईएम सर्विस इंजिनीअर्स उपलब्ध नसतानाही टीमने साधनांच्या उभारणीवर स्वत:च काम केले. अर्थात, ओईएम्सकडूनही यासाठी मदत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शिपबिल्डिंग बाजारपेठेत गांभीर्याने व्यवसाय करणारी कंपनी बनण्यावर आमचा भर असल्याचेही चौगुले म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाला हातभार-

चौगुले शिपयार्ड्सची सुरुवात १९५० मध्ये झाली. सुरुवातीला खाणींपासून - बंदरापर्यंत नदीमार्गे लोखंडाच्या वाहतुकीसाठी बार्जेस आयात करण्याचे काम ते करत होते. वर्षभरानंतर या समुहाने जहाजांसाठी दुरुस्ती यार्ड बांधले आणि १९६८ मध्ये या कंपनीचा विस्तार होत ती पूर्णपणे जहाज बांधणीतील कंपनी बनली. तेव्हापासून वाढत्या मागणीनुसार कंपनीने आपल्या दोन शिपयार्ड्समध्ये १७७ हून अधिक वेसल्सची उभारणी केली आहे. भविष्यातही अशा जागतिक दर्जाच्या वेसल्सची निर्मिती करण्यात सातत्य राखून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' दृष्टिकोनाला हातभार लावायचा असल्याचे चौगुले म्हणाले.

भारतात आधुनिक पेट्रोल बोट्सची निर्मिती -

सध्या कंपनीचे गोव्यात लोटली आणि रासेम येथे शिपयार्ड्स आहेत. या शिपयार्डमध्ये 3D मॉडेलिंग, काटेकोर प्रॉडक्शन ड्रॉइंग्स, नो ग्रीन संकल्पना आणि आधुनिक मॉड्युलर बांधकाम पद्धतींचा अवलंब केला जातो. २००५ मध्ये चौगुले आणि कंपनीने निर्यात बाजारपेठेत प्रवेश केला. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर या कंपनीची २९ (मल्टि-पर्पझ) एमपीपी कार्गो कॅरिअर वेसल प्रवास करत आहेत. तसेच डेन्मार्कच्या ट्युको मरिक ग्रुपसोबत भारतात आधुनिक पेट्रोल बोट्सच्या निर्मितीसाठी नुकतीच या कंपनीने भागीदारी केली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.