पणजी (गोवा) - भारतीय नौदलाने गोवा येथील नौदल एअर स्टेशन, आयएनएस हंसा येथे आपल्या ALH Mk-III या ऑल-वेदर चॉपर हेलिकॉप्टरला एअर अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतरित केले आहे. गोव्याच्या नौदल तळावर गंभीर रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध झाल्याने नौदलाच्या आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याच्या ताकदीत वाढ झाली आहे.
![Helicopter ambulance joins Indian Navy's Goa](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11960257_k.jpg)
हेलिकॉप्टरमध्येच अत्याधुनिक अतिदक्षता विभाग -
नौदलाच्या ऑल-वेदर हेलिकॉप्टरमध्येच अत्याधुनिक सोयींनी युक्त असा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही गंभीर रूग्णांना वैद्यकीय मदत देताना त्यांना अधिक उपचारासाठी स्थलांतरित करण्याची क्षमता आता गोव्याच्या नौदल तळावर उपलब्ध झाली आहे, अशी माहिती ट्विटरवरून पीआरओ डिफेन्स मुंबई यांनी दिली आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
![Helicopter ambulance](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sindhudurg-4-goa-sindhudurg-10022_30052021224500_3005f_1622394900_445.jpg)
हेही वाचा - पूर्णवेळ राज्यपालांसाठी गोवा काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र
प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही रुग्णाला कुठेही हलविण्याची क्षमता -
या हेलिकॉप्टरमध्येच अतिदक्षता विभाग तयार व सुसज्ज असल्याने आता प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही भारतीय नौदल गंभीर रुग्णांना हवाई मार्गाने वैद्यकीय उपचारासाठी अन्यत्र हलवू शकते. या हेलिकॉप्टरच्या अतिदक्षता विभागात डिफ्रिब्रिलेटर, मल्टीपार मॉनिटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट तसेच इन्फ्यूजन आणि सिरिंज पंप, असे दोन सेट्स आहेत. अशी माहितीही पीआरओ डिफेन्स मुंबई यांनी दिली आहे.
![Helicopter ambulance](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sindhudurg-4-goa-sindhudurg-10022_30052021224500_3005f_1622394900_932.jpg)
अत्याधुनिक सुविधा असलेले अतिदक्षता विभागात -
या हेलिकॉप्टरच्या अतिदक्षता विभागात रुग्णाच्या तोंडात किंवा श्वासनलिकेतील स्राव साफ करण्यासाठी सक्शन सिस्टम देखील आहे. ही यंत्रणा हेलिकॉप्टर मधील वीजपुरवठ्यावर चालविली जाऊ शकते आणि चार तासांचा बॅटरी बॅकअप उपलब्ध आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे कुटुंब प्रमुखाचे निधन झालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुबांना २ लाखांची मदत, गोवा सरकारची घोषणा