ETV Bharat / city

गोव्यात भारतीय तटरक्षक दलाने जहाजावरील एका कर्मचाऱ्याला वाचवले, पाहा हा व्हिडिओ..

गोव्याच्या किनाऱ्यावरील व्यापारी नौदलाच्या जहाजावरील कर्मचाऱ्याला आज भारतीय तटरक्षक दलाने वाचवले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रेस्क्यू करत इंडियन कोस्ट गार्डच्या चेतक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गोवा येथे आणण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथील रुग्नालयात दाखल करण्यात आल्याची माहिती इंडियन कोस्ट गार्डच्या गोवा विभागाकडून देण्यात आली.

Ship employee Rescue Goa
व्यापारी नौदल जहाज कर्मचारी आजारी गोवा
author img

By

Published : Jun 6, 2021, 9:18 PM IST

पणजी (गोवा) - गोव्याच्या किनाऱ्यावरील व्यापारी नौदलाच्या जहाजावरील कर्मचाऱ्याला आज भारतीय तटरक्षक दलाने वाचवले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रेस्क्यू करत इंडियन कोस्ट गार्डच्या चेतक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गोवा येथे आणण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथील रुग्नालयात दाखल करण्यात आल्याची माहिती इंडियन कोस्ट गार्डच्या गोवा विभागाकडून देण्यात आली.

रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ

हेही वाचा - पश्चिम बंगाल : बॉम्बस्फोटात भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, टीएमसीवर आरोप

जहाजातील एक कर्मचारी गंभीररीत्या आजारी

इंडियन कोस्ट गार्डच्या गोवा विभागाकडून सांगण्यात आले की, आज सकाळी मेरीटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (मुंबई) यांना एक संदेश मिळाला. त्यात एमटी एलिम जहाजातील एक कर्मचारी गंभीररीत्या आजारी आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. त्याला अर्धांगवायूचा झटका आला असून त्याच्या चेहऱ्याचा रंगही बदलला आहे. कर्मचाऱ्याला रेस्क्यू करण्याच्या सूचना आल्यानंतर तात्काळ कोस्ट गार्डने हालचाल केली आणि एक जहाज आणि हेलिकॉप्टर कर्मचारी तैनात असलेल्या जहाजाकडे रवाना केले.

चेतक हेलिकॉप्टरचा वापर करून रेस्क्यू

गोवा तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर जहाजाच्या दिशेने रवाना झाले आणि आजारी असलेल्या कर्मचाऱ्याला रेस्क्यू करून हेलिकॉप्टरमधून गोवा येथे तटरक्षक दलाच्या एअरबेसवर आणण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन आज सकाळी करण्यात आले असून आजारी कर्मचाऱ्याला गोवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - भारत आणि महाराष्ट्रातील गंभीर स्वरूपातील कुपोषित मुलांचे प्रमाण किती?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.