पणजी - हिवाळा सुरू झाला असून कडाक्याची थंडी पडली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यात पोहचत आहेत. आज गोव्यात पहिले चार्टर्ड विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. कझाकिस्तानहून आलेल्या या फ्लाइटमध्ये एका अर्भकासह 159 प्रवासी होते.
तब्बल दोन वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर गोव्यासाठी नवी पहाट उघडली आहे. याचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा फरक पडणार आहे. गोव्यात पोहचणाऱ्या सर्व प्रवाशांकडून कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात येत आहेत, असे गोवा विमानतळ संचालक गगन मलिक ( Goa Airport Director Gagan Malik ) यांनी म्हटलं. प्रवाशांच्या कोरोना चाचणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.