ETV Bharat / city

Goa Assembly Election Result 2022 : 'मगो'च्या किंगमेकर होण्याच्या स्वप्नाला गोवेकरांनी लावला सुरुंग, पराभव जिव्हारी? - गोवा मगो किंगमेकर बातमी

'मगो'च्या किंगमेकर होण्याच्या स्वप्नाला गोवेकरांनी ( Goa Assembly Election 2022 ) सुरुंग लावला आहे. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकरही ( Deepak Dhavlikar Lost Assembly Election ) पराभूत झाले आहेत. दीपक ढवळीकर यांचा प्रियोळ मतदारसंघात झालेला पराभव मगोच्या जिव्हारी लागला आहे.

Goa Assembly Election Result 2022
Goa Assembly Election Result 2022
author img

By

Published : Mar 11, 2022, 1:50 PM IST

पणजी - 'मगो'च्या किंगमेकर होण्याच्या स्वप्नाला गोवेकरांनी ( Goa Assembly Election 2022 ) सुरुंग लावला आहे. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकरही ( Deepak Dhavlikar Lost Assembly Election ) पराभूत झाले आहेत. दीपक ढवळीकर यांचा प्रियोळ मतदारसंघात झालेला पराभव मगोच्या जिव्हारी लागला आहे. ढवळीकर जिंकणार अशी हूल सगळीकडे उठली होती. उद्योजक संदीप निगळ्ये हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यामुळे त्यांच्यात आणि गोविंद गावडे यांच्‍यात मतांचे विभाजन होऊन ढवळीकर बाजी मारतील, असा अंदाज वर्तवला जात होता, पण तो खोटा ठरला.

हा मगोपला बसलेला धक्का? -

आपण कमीत कमी पाच हजार मतांनी विजयी होणार, असे वक्तव्य दीपक ढवळीकर यांनी केले होते. पण शेवटी गोविंद गावडे यांनीच बाजी मारली. हीच गोष्ट शिरोड्याची. शिरोड्यात सुभाष शिरोडकर यांच्‍याविरोधी वातावरण असल्याचे दिसत होते. त्यामुळे आम आदमी पक्षाचे महादेव नाईक हे विजयी होणार, अशी चर्चा सुरू होत होती. पण शेवटी शिरोडकरच जिंकले. फोंड्यात काँग्रेसचे राजेश वेरेकर आणि मगोपचे डॉ. केतन भाटीकर यांच्यात लढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे थोड्या फरकाने का होईना विजयी झालेच. हा मगोपला बसलेला जबरदस्त धक्का म्हणावा लागेल.

सुदिन ढवळीकर जरी विजयी झाले, तरी त्यांचे बंधू दीपक ढवळीकर व फोंड्यात केतन भाटीकर यांचा पराभव अंतर्मुख करणारा ठरू शकेल. आपल्या पक्षाला कमीत कमी पाच जागा मिळतील, असे सांगणाऱ्या मगोपच्या पदरात फक्त दोनच जागा पडू शकल्या. यावेळी राजकारणात आपण ‘किंगमेकर्स’ बनणार, अशी जी समजूत मगोपने करून घेतली होती. तिचे तीनतेरा वाजल्‍याचे दिसून येत आहे. तृणमूलशी केलेली युती मगोपच्या अंगलट आली, अशी चर्चा सध्या फोंडा तालुक्यात सुरू आहे. पण काही का असेना या निवडणुकीने मगोप अधिकच पिछाडीवर गेल्याचे दिसून येते. मागच्या वेळी मगोपला तीन जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी युद्धपातळीवर प्रचार करूनही मगोपला केवळ दोन जागा मिळणे यातच त्‍या पक्षाची दुरावस्था स्पष्ट होते. हे पाहता फोंडा तालुक्यात एकीकडे भाजपचा दबदबा, दुसरीकडे मगोपची पिछाडी तर तिसरीकडे काँग्रेसचा धुव्वा असेच चित्र दिसून आले.

हेही वाचा - PM MODI Gujrat Visit : पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो; आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.