ETV Bharat / city

अधिकाधिक आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी भागीदार घेण्याची सरकारची तयारी - आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

author img

By

Published : Sep 16, 2019, 9:37 AM IST

दक्षिण गोव्यातील रुग्णालय नाहीत त्यामुळे मडगाल येथली जिल्हा रुग्णालयात सरकारी-खासगी भागिदारीतून वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

पणजी - गोव्यात डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा मिळणे कठीण होत आहे. यावर उपाय म्हणून मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. मुरगांव तालुक्यातील चिखली येथील काँटेज रुग्णालय गोव्यातील खासगी डॉक्टरांना चालवण्यासाठी देण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

मिरामार येथील खासगी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयावर अधिक ताण पडत आहे. दक्षिण गोव्यात रुग्णालय नाही. त्यामुळे मडगाल येथील जिल्हा रुग्णालयात सरकारी-खासगी भागिदारीतून वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. याबरोबर त्यासाठी आवश्यकता भासल्यास 10 एकर जमीन सरकार देणार आहे. यामुळे आरोग्य सुविधांबरोबर डॉक्टरांची संख्याही वाढणार आहे. चिखली येथील काँटेज रुग्णालय चालवण्यासाठी काही खासगी डॉक्टर तयार आहेत. सरकार त्याचाही विचार करत असून मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे सर्व जरी आम्ही करत असलो तरी याचा अभ्यास केंद्रीय नीती आयोगाने केलेला आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - जगाला आकर्षित करण्यासाठी धनापेक्षा धारणा बदलणे आवश्यक - प्रल्हाद पटेल

केंद्रीय सचिव प्रीती सुदन यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली होती. तेव्हा येथील महिला आणि बाल कल्याण विभागाचे कामकाज पाहून त्यांनी 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे, असे सांगून राणे म्हणाले, यामधून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आई आणि बालक यांच्यासाठी अत्याधुनिक विभाग सुरू केला जाणार आहे.

गोव्यात 'एम्स' साठी प्रयत्न -

भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) रुग्णालय गोव्यात उभारण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासाठी धारबांदोडा अथवा सत्तरी येथे आवश्यक जागा उपलब्ध आहे, असे राणे म्हणाले.

हेही वाचा - पाण्यावरून दोन भाजपशासित राज्यात वाद उकळला; गोवा सरकारची आक्रमक भूमिका

गोव्यातील औद्योगिक क्षेत्राचे डिजिटायझेशन -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याच्या औद्योगिक क्षेत्रासाठी नवे, 'स्टार्टअप ' धोरण राबवण्यात येणार आहे. ज्यामुळे उद्योजकांना गोव्यात येण्यास सोपे होईल. त्याबरोबरच गोव्यातील सर्व औद्योगिक क्षेत्राचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. यापुढे गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रत्येक कृतीला वेळेची मर्यादा असणार आहे. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) घेण्यात आलेली रक्कम परत करून जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. दरम्यान, राज्यात 100 नव्या अंगणवाड्या उभारण्यात येणार आहेत. महिलांना आर्थिक घडामोडी अंतर्गत एकत्रित आणले जाणार आहे, असेही राणे म्हणाले.

डेंग्यूमुळे यावर्षी अधिक मृत्यू -

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूची लागण कमी असली तरी डेंग्यूमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती देत राणे म्हणाले, आतापर्यंत डेंग्यूचे 30 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये दक्षिण गोव्यातील मुरगांव आणि पणजीतील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्वत्र धूर फवारणीचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही नागरिकांना जागरूक रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Intro:पणजी : गोव्यात डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा मिळणे कठीण होत आहे. यावर उपाय म्हणून मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात खाजगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुरगांव तालुक्यातील चिखली येथी काँटेज रुग्णालय गोव्यातील खाजगी डॉक्टरना चालविण्यासाठी देण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

Body:मिरामार येथील आपल्या खाजगी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयावर अधिक ताण पडत आहे. तसेच दक्षिण गोव्यात तसे इस्पितळ नाही. त्यामुळे मडगाल येथील जिल्हा रूग्णालयात सरकारी-खाजगी भागिदारीतून वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्याबरोबर त्यासाठी आवश्यकता भासल्यास 10 एकर जमीन सरकार देणार आहे. ज्यामुळे आरोग्य सुविधा मिळतीलच परंतु, डॉक्टरांची संख्याही वाढणार आहे. तर चिखली येथील काँटेज इस्पितळ चालविण्यासाठी काही खाजगी डॉक्टर तयार आहेत. सरकार त्याचाही विचार करत असून मंत्रीमंडळ निर्णय घेणार आहे.याची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे सर्व जरी आम्ही करत असलो तरी त्याचा अभ्यास केंद्रीय नीती आयोगाने केलेला आहे.
केंद्रीय सचिव प्रीती सुदन यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली होती. तेव्हा येथील महिला आणि बाल कल्याण विभागाचे कामकाज पाहून 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे, असे सांगून राणे म्हणाले, यामधून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आई आणि बालक यांच्यासाठी अत्याधुनिक विभाग सुरु केला जाणार आहे.
गोव्यात 'एम्स 'साठी प्रयत्न
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) रुग्णालय गोव्यात उभारण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असे सांगून राणे म्हणाले, यासाठी धारबांदोडा अथवा सत्तरी येथे आवश्यक जागा उपलब्ध आहे.
गोव्यातील औद्योगिक क्षेत्राचे डिजिटायझेशन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याच्या औद्योगिक क्षेत्रासाठी नवे ,'स्टार्टअप ' धोरण राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे उद्योजकांना गोव्यात येण्यास सोपे होईल, असेल सांगून राणे म्हणाले, त्याबरोबरच गोव्यातील सर्व औद्योगिक क्षेत्राचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. यापुढे गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रत्येक क्रूतीला वेळेची मर्यादा असणार आहे. तसेच विशेष आर्थिक क्षेत्रा (सेझ) साठी घेण्यात आलेली रक्कम परत करून जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. दरम्यान, राज्यात 100 नव्या अंगणवाडी उभारण्यात येणार आहेत. तसेच महिलांना आर्थिक घडामोडी अंतर्गत एकत्रित आणले जाणार आहे, असेही राणे म्हणाले.
.
डेंग्यूमुळे यावर्षी अधिक म्रुत्यु
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लागण कमी असली तरी डेंग्यूमुळे म्रुत्युचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती देत राणे म्हणाले, आतापर्यंत डेंग्यूचे 30 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये दक्षिण गोव्यातील मुरगांव आणि पणजीतील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्वत्र धूर फवारणीचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही नागरिकांना जागरूक रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.