ETV Bharat / city

Goa Election 2021 : गोव्यात जयेश साळगावकर भाजपवासी; पणजीत हजारो कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन

गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर ( Jayesh Salgaonkar Joins BJP ) यांनी गुरुवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शुक्रवारी भाजपात प्रवेश केला.

author img

By

Published : Dec 4, 2021, 10:12 AM IST

Jayesh Salgaonkar Joins BJP
जयेश साळगावकर यांचा भाजपात प्रवेश

पणजी - गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर ( Jayesh Salgaonkar Joins BJP ) यांनी गुरुवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. गोवा फॉरवर्डचा राजीनामा देऊन शुक्रवारी भाजपवासी झालेल्या जयेश साळगावकर यांनी शुक्रवारी पणजीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी रात्री त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर यांच्याकडे सोपवला होता. साळगावकर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन राजधानी पणजी गाठली. त्यांचे हजारो कार्यकर्ते त्यांना साथ देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

जयेश साळगावकर यांचा भाजपात प्रवेश

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या उपस्थितीत साळगावकर यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षात आपले राजकीय भवितव्य उज्वल आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नामुळे आपल्या मतदारसंघाचा विकास झाला म्हणून आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोहर पर्रिकरांची उणीव तर प्रमोद सावंत मुख्यमंत्री पदाचे दावेदार -

राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री यांच्या निधनानंतर भाजपा प्रथमच निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे पर्रिकरांची उणीव या निवडणुकीत भाजपला जाणवणार हे मात्र नक्की. परंतु पर्रिकरांची जागा डॉ. प्रमोद सावंत भरून काढणार काय, तसेच सावंतांच्या नेतृत्वाखाली भाजप किती यशस्वी होणार, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. तरीही भाजपने विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावावर पुढील मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.