ETV Bharat / city

गोव्यात बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

गोवा उच्च माध्यमिक मंडळाकडून २० फेब्रुवारी ते २६ मार्चदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १६ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

बारावी निकाल घोषित
author img

By

Published : Apr 30, 2019, 11:59 AM IST

Updated : Apr 30, 2019, 3:09 PM IST

गोवा - राज्याचे उच्च माध्यमिक मंडळाचे घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. परीक्षेत एकूण ८९.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी दिली. गेल्यावर्षी ८५.८४ टक्यांपेक्षा यावर्षी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. ९१.९७ टक्यांसह मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

गोवा बारावी बोर्डाचे निकाल घोषणा

गोवा उच्च माध्यमिक मंडळाकडून २० फेब्रुवारी ते २६ मार्चदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १६ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील १५ हजार १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७ हजार ९८५ मुलांनी परीक्षा दिली होती. यापैकी, ६ हजार ९४० मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.९१ टक्के असे आहे. तर, ८ हजार ९६७ परीक्षा दिलेल्या मुलींपैकी ८ हजार २४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा सरस ९१.९७ टक्के असे आहे.

निकालात १५ टक्के विद्यार्थ्यांनी ७५ ते १०० टक्के गुण मिळवले आहेत. ४० टक्के विद्यार्थ्यांनी ६० ते ७४ टक्के गुण घेतले आहेत. तर, ३५ टक्के विद्यार्थ्यांनी ४५ ते ५९ टक्के गुण मिळवले आहे.

विभागानिहाय परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण

  • कला - ८७.७३ टक्के
  • वाणिज्य - ९१.८६ टक्के
  • विज्ञान - ९१.७६ टक्के

उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ मेपर्यंत, पुनर्मुल्यांकनासाठी ९ मेपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. 7 जून रोजी काही विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. तर यासाठीची सराव परीक्षाही घेण्यात येणार आहे. यासाठी उत्तर गोव्यात म्हापसा येथे तर दक्षिण गोव्यात नुवे केंद्राची निवड करण्यात आली आहे.

Intro:Body:

गोव्यात बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी.

गोवा उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांच्याकडून बारावीचा निकाल घोषित.

89.59% विद्यार्थी उत्तीर्ण

एकुण 16952 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधील 15187 उत्तीर्ण.

मुलगे 79850पैकी6940(86.91%) मुली 8967 पैकी 8247(91.97%)

..

20फेब्रु ते 26 मार्च दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती.

Conclusion:
Last Updated : Apr 30, 2019, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.