ETV Bharat / city

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी मानले अन्न आणि औषध प्रशासनाचे आभार - goa no corona

कोरोनामक्त होणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळेच आज गोव्याचे आरोगग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे आभार मानले आहे.

goa-corona-free-state-says-health-minister-vishwajit-rane
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी मानले अन्न आणि औषध प्रशासनाचे आभार
author img

By

Published : Apr 25, 2020, 7:56 AM IST

पणजी - कोरोनामुक्त होणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळेच गोव्याचे आरोगग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे आभार मानले आहे.

राणे यांनी फेसबुकद्वारे एफडीएचे आभार मानताना म्हटले आहे की, गोव्यातील ओषध पुरवठा सुरळीत राहण्याबरोबरच इतर जीवनावश्यक घडामोडी सुरळीत राहण्यासाठी एफडीएने महत्वपूर्ण आणि नियोजनबद्ध काम केले. त्यामुळे संचालक ज्योती सरदेसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार. कोरोना विरोधातील या लढाईत एफडीएचे आभार. कोविड-19 विरोधात सर्व गोमंतकीय एकीने लढतील, असेही म्हटले आहे.

उपचार पूर्ण केलेला केवळ एकच रुग्ण सरकारी क्वारंटाईनमध्ये
कोविडवर यशस्वी मात केलेल्या सातही रुग्णाना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तरीही अतिरिक्त खबरदारी घेत त्यांना सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील सहा जणांना सात दिवसानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर घरी गेल्यावर ते पुन्हा सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. त्यानंतर आपले नियमित जीवनक्रम सुरू करतील. त्यामुळे आता केवळ एक रुग्ण सरकारी क्वारंटाईनमध्ये आहे. गुरुवारी दिवसभरात 90 नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. तर 49 अहवाल प्राप्त झाले आणि ते सर्व निगेटिव्ह आलेत. दिवसभरात 18 जणांना फेसिलिटी क्वारंटाईनमध्ये दाखल केले. तर 4 संभाव्य रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अलगीकरण विभागात ठेवण्यात आले. दरम्यान, कोविड रुग्णालयात सध्या एकही रुग्ण नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.