ETV Bharat / city

गोवा सुरक्षा मंचचा उमेदवार विधानसभेत कधीच नाही पोहोचणार - मुख्यमंत्री सावंत

गोसुमंला मत म्हणजे काँग्रेसला मत हे त्यांना कळून चुकले आहे. तसेच गोसुमं हा मंचच दिसतो आहे. तो राजकीय पक्ष होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. कारण, त्यांचा पूर्वी विरोध करणार कार्यकर्ता निवडणुकीत आलिंगन देतो, तर उमेदवाराचा मुलगा दुसऱ्याच उमेवारांच्या प्रचारात दिसतो. त्यामुळे त्यांचा उमेदवार विधानसभेत कधीच पोहोचणार नाही, असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे

डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : May 17, 2019, 8:30 PM IST

पणजी - भाषेवरून राजकारण होऊ शकत नाही. यासाठी सर्वसामान्य तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. त्यामुळे गोवा सुरक्षा मंच कधीच राजकीय पक्ष होऊ शकणार नाही, असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ते भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉ. प्रमोद सावंत

डॉ. सावंत म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारच्या सभेत गोवा सुरक्षा मंंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य हे पूर्वीच्या अनुभवावरून केले होते. आज स्थिती वेगळी असून गोव्याचे लोक हुशार आहेत. गोसुमंला मत म्हणजे काँग्रेसला मत हे त्यांना कळून चुकले आहे. तसेच गोसुमं हा मंचच दिसतो आहे. तो राजकीय पक्ष होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. कारण, त्यांचा पूर्वी विरोध करणार कार्यकर्ता निवडणुकीत आलिंगन देतो, तर उमेदवाराचा मुलगा दुसऱ्याच उमेवारांच्या प्रचारात दिसतो. त्यामुळे त्यांचा उमेदवार विधानसभेत कधीच पोहोचणार नाही. याशिवाय भाषा विषयावर राजकारण कधीच होऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसने गोव्यात सरकार स्थापनेचे दिवास्वप्न पाहू नये -

गुरुवारच्या जाहीर प्रचारसभेत काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी पणजीतील प्रत्येक घरात सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच पणजीतील युवकांना रोजगार नसल्याने आईवडील रडतात. तसेच २४ मेला गोव्यात काँग्रेस सरकार येणार, असे म्हटले होते. या विधानाचा समाचार घेताना डॉ. सावंत म्हणाले, काँग्रेसने गोव्यात सरकार स्थापनेचे दिवास्वप्न पाहू नये. सरकारमधील घटकपक्ष आणि अपक्ष सरकार सोबत आहेत. त्यामुळे या तीन वर्षांबरोबरच पुढील पाच वर्षे गोव्यात भाजपचेच सरकार असेल. शिवाय २४ मे रोजी जर काँग्रेस सरकार स्थापन करणार असेल तर आमदार संख्या कशी सिद्ध करणार? कारण, आमचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार विदेशात असून ते २८ मे'ला राज्यात परतणार असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

सावंत पुढे म्हणाले, गोव्यातील युवक गोव्याबाहेर जाण्याला काँग्रेस जबाबदार आहे. बाबूश मोन्सेरात यांनी येथील युवकांची वाट लावली. मोन्सेरात म्हणातात आईवडील रडतात ते खरे आहे. पण पणजीतील नव्हे तर ताळगावातील, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच गोव्यात स्थीर सरकार देण्यासाठी पणजीत भाजप उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. ही निवडणूक सत्य विरूद्ध असत्य अशी आहे. बाबूशसाठी राजकारण हा धंदा आहे. तर भाजपला समाजातील शेवटच्या माणसाचा विकास साधावयाचा आहे. युवकांसाठीचे बंद असलेले युवा धोरण लवकरच राबविण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

गुरुवारी रात्री भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्याचा निषेध करत डॉ. सावंत म्हणाले, १९९४ पूर्वी तिसवाडीत असे प्रकार घडत असत. अशा प्रकारांना येथे थारा दिला जाणार नाही. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांनी ज्याचे नाव सांगितले, त्याला लवकरच अटक केली जाणार आहे.

Intro:पणजी : भाषाविषयावर राजकारण होऊ शकत नाही. यासाठी सर्वसामान्य तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. त्यामुळे गोवा सुरक्षामंच कधीच राजकीय पक्ष होऊ शकणार नाही, असे प्रतिसाद गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे केले.

Body:भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सावंत म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारच्या सभेत गोवा सुरक्षा मंंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य हे पूर्वीच्या अनुभवावरून केले होते. आज स्थिती वेगळी असून गोव्याचे लोक हुशार आहेत. गोसुमंला मत म्हणजे काँग्रेसला मत हे त्यांना कळून चुकले आहे. तसेच गोसुमं हा मंचच दिसतो आहे. तो राजकीय पक्ष होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे. कारण त्यांच्या पूर्वी विरोध करणार कार्यकर्ता निवडणुकीत आलिंगन देतो तर उमेदवाराचा मुलगा दुसऱ्याच उमेवारांच्या प्रचारात दिसतो. शिवाय भाषा विषयावर राजकारण कधीच होऊ शकत नाही.
गुरुवारच्या जाहीर प्रचारसभेत काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी पणजीतील प्रत्येक घरात सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच पणजीतील युवकांना रोजगार नसल्याने आईवडील रडतात. तसेच 24 मे रोजी गोव्यात काँग्रेस सरकार येणार, असे म्हटले होते. या विधानाचा समाचार घेताना डॉ. सावंत म्हणाले, काँग्रेसने गोव्यात सरकार स्थापनेचे दिवास्वप्न पाहू नये. सरकारमधील घटकपक्ष आणि अपक्ष सरकार सोबत आहेत. त्यामुळे या तीन वर्षांबरोबरच पुढील पाच वर्षे गोव्यात भाजपचेच सरकार असेल. शिवाय 24 मे रोजी जर काँग्रेस सरकार स्थापन करणार असेल तर आमदार संख्या कशी सिद्ध करणार कारण आमचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार विदेशात असून ते 28 मे रोजी परतणार आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, गोव्यातील युवक गोव्याबाहेर जाण्याला काँग्रेस जबाबदार आहे. बाबूश मोन्सेरात यांनी येथील युवकांची वाट लावली. मोन्सेरात म्हणातात आईवडील रडतात ते खरे आहे. पण पणजीतील नव्हे तर ताळगावातील. तसेच गोव्यात स्थीर सरकार देण्यासाठी पणजीत भाजप उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. ही निवडणूक सत्य विरूद्ध असत्य अशी आहे. बाबूशसाठी राजकारण हा धंदा आहे तळ भाजपला समाजातील शेवटच्या माणसाचा विकास साधावयाचा आहे. युवकांसाठीचे बंद असलेले युवा धोरण लवकरच राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे.
गुरुवारी रात्री भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्याचा निषेध करत डॉ. सावंत म्हणाले, 1994 पूर्वी तिसवाडीत असे प्रकार घडत असत.अशा प्रकारांना येथे थारा दिला जाणार नाही. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांनी ज्याचे नाव सांगितले त्याला लवकरच अटक केली जाणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.