पणजी - गोव्यातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी दारू पिऊन गाडी चालविण्याचे आढळल्यास आता थेट सहा महिन्याची तुरुंगवास व दहा हजाराचा दंड भरावा लागणार आहे याविषयीची माहिती गोवा पोलिसांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही ड्रिंक आणि ड्राईव्ह करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघातात वाढ - राज्यात मागच्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेसमुळे अपघातात वाढ झाली आहे. याचे परिणाम पर्यटकांसोबत स्थानीक नागरिकांनाही भोगावे लागत आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची पथके तैनात करण्यात येणार असून अशा प्रकारे दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास थेट दहा हजाराचा दंड किंवा सहा महिन्याची काय या प्रकारच्या शिक्षा होणार आहेत.
बुधवारच्या घटनेमुळे राज्य सरकार जागृत - मागच्या आठवड्यात बुधवारी रात्री दक्षिण गोव्यातून आगाशी येथे येत असताना एका कुटुंबातील चौघांचा ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झाला होता त्यामुळे सरकार जागृत होऊन याविषयीचा प्रकार भविष्यात होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं.
मोटार कायद्यात बदल - रात्रीच्या वेळी दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास आता थेट सजा होणारच पण अल्पवयीन मुले ही दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवरही कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं. दरम्यान असे अपघात टाळण्यासाठी मोटार कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं संकेत पोलिसांनी दिले आहेत. तथापि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाच्या पुलांवर आणि प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले.