पणजी : विषाणू संसर्गाच्या भीतीने आम्ही कोणालाही गोव्यात येण्यापासून रोखू शकत नाही. मात्र, येणाऱ्या पर्यटकांची आवश्यक तपासणी केली जाईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सावंत यांना कोरेना व्हायरसबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहे, असे विचारले असता ते म्हणाले, याबाबत राष्ट्रीय स्तरावरून जी खबरदारी घेतली जात आहे, तशीच खबरदारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय घेत आहे. असा संसर्गजन्य संशयित आढळल्यास त्यासाठी गोमेकॉमध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, 28 जानेवारी रोजी ज्या पर्यटकाला शंशयाने गोमेकॉमध्ये भरती करण्यात आले आहे. त्याच्या रक्ताचा अहवाला प्राप्त झला असून तो नकारात्मक आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयातून सोडून देण्यात आले. सदर संशयित रुग्ण गोव्यात येण्यापूर्वी चीनचा प्रवास करून आला होता.
कोरोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गोवा सरकारने सुरूवातीपासून आवश्यक काळजी घेतानाच कृती दलाची स्थापना केली. तसेच दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळापासून जवळ असलेल्या चिखली रुग्णालयात विशेष तपासणी केंद्र तयार करण्यात आले आहे. तसेच अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे.