ETV Bharat / city

गोव्यात सरकारचे काम फास्ट ट्रॅकवर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार जनतेच्या दारी - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

अवघ्या ५ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील प्रलंबित कामे फास्ट ट्रॅक वर करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. गुरुवारी उशिरा मुख्यमंत्री सावंत यांनी आढावा बैठक घेत प्रशासनाला हे आदेश दिले आहेत.

सरकारचे काम फास्ट ट्रॅकवर
सरकारचे काम फास्ट ट्रॅकवर
author img

By

Published : Oct 8, 2021, 7:02 AM IST

Updated : Oct 8, 2021, 7:19 AM IST

पणजी- राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात मागच्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतांचा जोगवा मागण्यांसाठी भाजपा सरकार सज्ज झाली आहे. त्या दृष्टीने सरकारच्या विविध योजना व केलेली विकासकामे घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या प्रत्येक मतदारसंघात 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम राबवित आहेत.

31 डिसेंबर डेडलाईन-

राज्यात भाजपा सरकारने कोविड काळात अनेक विकास कामे हाती घेतली आहेत. त्यातील काही पूर्णत्वास गेली तर काही अपूर्णवस्थेत आहेत. ही प्रलंबित कामे 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे प्रशासन चांगलेच कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

सरकारचे काम फास्ट ट्रॅकवर
सरकारचे काम फास्ट ट्रॅकवर
दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची सरकारसमोर आव्हाने-

नुकतेच गोव्याचा स्वातंत्र्य संग्रामला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे सरकारने 'गोवा@६०' हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत राज्य प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. सोबतच राज्यात प्रलंबित असणारा रोजगार, खाणी पुन्हा सुरू करणे, पर्यटनाला उभारी देणे ही आव्हाने मुख्यमंत्र्यांसमोर आहेत. विरोधीपक्ष ही निवडणुकीमुळे जोरदार आव्हान मुख्यमंत्री व भाजपला देत आहेत. त्यामुळे अनेकवेळा मुख्यमंत्री व विरोधीपक्ष यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगत आहे.

सरकार तुमच्या दारी मात्र नाराज अधिकारीनी कर्मचारी-

मुळातच गोव्याची ओळखच ही रिलॅक्स आणि सुशेगाद जीवनशैलीची, ती सवयही इथल्या लोकांची अंगवळणी पडलीये. त्याला सरकारी अधिकारी आणि कर्मचारी अपवाद कसे असतील. मात्र मागच्या महिनाभरापासून राज्यात सरकार तुमच्या दारी हा उपक्रम सुरू केला. त्याअनुषंगाने दर शनिवार आणि रविवारी मुख्यमंत्री आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन नागरिकांच्या दारोदारी भेट देतात, त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी कामाचा अतिरिक्त ताण वाढल्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. काही सरकारी कर्मचारी खासगीत सरकारच्या या कार्यक्रमावर टीकाही करत आहेत.

हेही वाचा - गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दहा नेत्यांसह तृणमूलमध्ये प्रवेश; कोलकात्यात ममता बॅनर्जींची घेतली भेट

हेही वाचा - गोवा : पर्यटनासाठी सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार - पर्यटनमंत्री

Last Updated : Oct 8, 2021, 7:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.