ETV Bharat / city

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी सादर केला 353.61 कोटींच्या महसूली शिलकीचा अर्थसंकल्प - गोवा शिल्लकीचा अर्थसंकल्प

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याचा 353.61 कोटींचा महसुली शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात खाण व्यवसाय, अंतर्गत पर्यटन, मेडिकल आणि इको-टुरिझम यांवर भर देण्यात आला आहे.

गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Feb 7, 2020, 6:15 AM IST

पणजी - गोवा विधानसभेचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. विरोधी पक्षाचे सभासद सभागृहात याबाबत निषेध व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याचा 353.61 कोटींचा महसुली शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात खाण व्यवसाय, अंतर्गत पर्यटन, मेडिकल आणि इको-टुरिझम यांवर भर देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'हा' प्रश्न विचारताच सभापतींनी विधानसभेचे कामकाज केले स्थगित

डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी गोवा विधानसभेत मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सकाळपासून चारवेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतानाही विरोध पक्षांचे आमदार सभापतींच्या समोरील हौदात दाखल होत घोषणा देत होते. त्यावेळी जर अर्थसंकल्प ऐकायचा नसेल बाहेर जाऊ शकता, अशी सुचना सभासदांना करण्यात आली. मात्र, तरिही सभासद गोंधळ घालत होते. अखेरीस सभापती राजेश पाटणेकर यांनी मार्शल करवी त्यांना सभागृहाबाहेर काढले. यामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड, रवी नाईक, मगोचे सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे यांचा समावेश होता.

हेही वाचा... 'विषाणू संसर्गाच्या भीतीने गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना रोखू शकत नाही'

सावंत यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात 8.6 टक्के जीएसडीपी वाढीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. 21056.35 कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक असून महसुली खर्च 14906 कोटी तर भांडवली खर्च 5069.32 कोटी अपेक्षित आहे. यामध्ये राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणार्थी कार्यक्रम विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी विद्यावेतन योजना घोषित करण्यात आली आहे. तसेच मानव संसाधन विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या, या योजनेसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे कष्टकरी जनतेला लाभदाय अशी नवी 'श्रमसन्मान' योजना जाहीर करण्यात आली आहे. पर्यटन आणि खाण व्यवसाय हे गोव्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावणारे घटक आहे. त्यामुळे केवळ किनाळी पर्यटनावर अवलंबून न राहता इको-टुरिझम, अंतर्गत भागातील पर्यटन, साहसी पर्यटन आणि मेडिकल टुरिझम याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याबरोबरच कला आणि संस्कृती, क्रुषी, आरोग्य, वन आदी अनेक विभागांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा... कडका-तिसवाडीचा स्टेडी कार्दोज ठरला गोवा मेरेथॉनचा विजेता

यावर्षी 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. ज्यामध्ये सुमारे 9500 क्रीडापटू आणि 2000 हून अधिक अधिकारी सहभागी होणार आहे. यासाठी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मोपा विमानतळ 2022 पर्यंत सुरु झाले तर किमान 25 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच यावर्षी खाण व्यवसायाकडून 500 कोटींचा तर वस्तू आणि सेवा कराद्वारे 300 कोटींचा महसूल अपेक्षित आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी संत तुकाराम यांच्या 'असाध्य ते साध्य करिती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे' या वचनाने आपल्या वाचनाची सुरूवात केली. तर शेवट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेने करताना अंदाजपत्रकाणी यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Intro:पणजी : अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मध्यरात्री केलेल्या अटकेचा निषेध करत विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात निदर्शने करत असतानाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 353.61 कोटींचा महसुली शिल्लकीचा गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये खाण व्यवसाय, अंतर्गत पर्यटन, मेडिकल आणि इको-टुरिझम यांवर भर देण्यात आला आहे.

Body:डॉ. सावंत यांनी आज गोवा विधानसभेत मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे आज सकाळपासून चारवेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतानाही विरोध पक्षांचे आमदार सभापतींच्या समोरील हौदात दाखल होत 'शेम, शेम' म्हणून घोषणा देऊ लागले. जर अर्थसंकल्प ऐकायचा नसेल बाहेर जाऊ शकता असे सांगूनही ते आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यामुळे अखेरीस त् सभापती राजेश पाटणेकर यांनी मार्शल करवी त्यांना सभागृहाबाहेर काढले. यामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काग्रेसचे ज्येष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड, रवी नाईक, मगोचे सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे यांचा समावेश होता.
या अर्थसंकल्पात 8.6 टक्के जीएसडीपी वाढीणे लक्ष ठेवले आहे. 21056.35 कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक असून महसुली खर्च 14906 कोटी तर भांडवली खर्च 5069.32 कोटी अपेक्षित आहे. यामध्ये राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्यादृष्टीने प्रशिक्षणार्थी कार्यक्रम विस्तार करण्याकरिता मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी विद्यावेतन योजना घोषित करण्यात आली असून मानव संसाधन विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कष्टकरी जनतेला लाभदाय अशी 'श्रमसन्मान' ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. पर्यटन आणि खाण व्यवसाय हे गोव्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावणारे घटक आहे. त्यामुळे केवळ किनाळी पर्यटनावर अवलंबून न राहता इको-टुरिझम, अंतर्गत भागातील पर्यटन, साहसी पर्यटन आणि मेडिकल टुरिझम याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याबरोबरच कला आणि संस्कृती, क्रुषी, आरोग्य, वन आदी अनेक विभागांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.
यावर्षी 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. ज्यामध्ये सुमारे 9500 क्रीडापटू आणि 2000 हून अधिक अधिकारी सहभागी होणार आहे. यासाठी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 250 कोटींचु तरतूद करण्यात आली आहे. मोपा विमानतळ 2022 पर्यंत सुरु झाले तर किमान 25 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच यावर्षी खाण व्यवसायाकडून 500 कोटींचा तर वस्तू आणि सेवा कराद्वारे 300 कोटींचा महसूल अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी संत तुकाराम यांच्या 'असाध्य ते साध्य करिती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे' या वचनाने केली. तर शेवट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेने करताना अंदाजपत्रकाणी यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.