पणजी : विरोधी पक्षांच्या आमदारांकडून सभापतींच्या समोरील हौदात गोंधळ घालणे सुरु असल्यामुळे प्रभारी सभापती इजिदोर फर्नांडिस यांनी विरोधी पक्षातील दोन आमदारांना मार्शलद्वारे सभागृहाबाहेर काढले. त्यामुळे सर्वच विरोधी आमदार सभागृहाबाहेर गेले. त्यानंतर कामकाज सुरळीतपणे सुरु झाले. परंतु, प्रश्न विचारणारे कुणीच नसल्याने आणि सभागृहासमोर काहीच काम नसल्याने सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करून अर्थसंकल्पीय अधिवेशनची सांगता करण्यात आली.
त्यानंतर सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी लक्षवेधी मांडत खरीपात वन्यप्राण्यामुळे होणारी नुकसान भरपाई वाढीव आणि तत्काळ देण्याची मागणी केली. त्याला कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पूर्तीचे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सरकारी विधेयके मांडली ती मंजूर करण्यात आली. यामध्ये खाजगी विद्यापीठाना परवानगी देणे आणि वाहतूक करासंबंधी विधेयकांचा समावेश आहे.
आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेच्या चौकशी आणि निषेधावर आजही विरोध ठाम होते. त्यामुळे त्यांचा गोंधळ कायम ठेवल्यामुळे सभापतींनी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदाई आणि अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांना मार्शलद्वारे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सर्वच विरोधी आमदार सभागृहाबाहेर पडले. त्यानंतर ते थेट राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी पोहचले.
अधिवेशनाचा कार्यकाळ 23 तास 15 मिनिटे
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दि. 7 जानेवारी रोजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर दि. 3 ते 7 फेब्रुवारी पर्यंत 23 तास 15 मिनिटे एवढा काळ कामकाज झाले. यामध्ये 368 प्रस्ताव होते. ज्यामध्ये एक स्थगन प्रस्ताव मांडला गेला. 250 तारांकित तर 655 अतारांकित असे एकुण 894 प्रश्न मांडण्यात आले. यामध्ये 238 प्रश्नांपैकी 22 प्रश्नांना तोंडी उत्तरे दिली गेली. तर 218 तारांकित आणि 655 अतारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आले. काही पुढील अधिवेशनासाठी पुढे ढकलण्यात आले. 10 लक्षवेधी, 25 प्रश्न शून्य प्रहरात मांडण्यात आले, 11 श्रद्धांजली ठराव, 7 अभिनंदन ठराव मांडण्यात आले. यासाठी 250 दस्तावेज ठेवण्यात आले. 11 विधेयके मांडण्यात आली. ज्यामध्ये 7 सरकारी विधेयकांना मंजुरी देण्यात आली.