ETV Bharat / city

Goa Assembly elections : राणे कुटुंबात पुन्हा एकदा वाद पेटला.. राणेंविरुद्ध त्यांची सूनबाईच मैदानात - गोवा विधानसभा निवडणूक 2022

भाजपने नुकतीच पर्यें मतदारसंघातून (Goa Assembly elections) प्रतापसिंह राणे यांची सून आणि विश्वजित राणे यांची पत्नी विद्या राणे ( Pratap Singh Rane fight with daughter in law)यांना उमेदवारी जाहीर केली आहे. म्हणूनच विद्या राणे आणि पर्यायाने भाजप आणि विश्वजित राणे यांना शह देण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे

Goa Assembly elections
Goa Assembly elections
author img

By

Published : Jan 24, 2022, 4:31 PM IST

पणजी (गोवा) - राज्यात (Goa Assembly elections) राणे पिता पुत्रांचा वाद पुन्हा एकदा उफाळून वर आलाय. आता मतदारसंघात राणेविरुद्ध त्यांची सून (Pratap Singh Rane fight with daughter in law) विधानसभा निवडणूक लढविणार आहे. राजकारणात 50 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलांनी निवृत्ती घ्यावी, अशी भावना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली होती, मात्र त्याला आव्हान देत आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे प्रतापसिंह राणे यांनी सांगितले होते. मात्र मधल्या काळात सिनियर राणे यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा राणे कुटुंबियांचा वाद शमल्यात जमा होता.

सिनियर राणे निवडणूक लढविणार -
भाजपने नुकतीच पर्यें मतदारसंघातून प्रतापसिंह राणे यांची सून आणि विश्वजित राणे यांची पत्नी विद्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. म्हणूनच विद्या राणे आणि पर्यायाने भाजप आणि विश्वजित राणे यांना शह देण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. दरम्यान सिनियर राणे यांनी आजपासून आपला प्रचारास सुरुवात केली असून लवकरच ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.