ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : गोव्यात उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीचे बंड, लढणार अपक्ष निवडणूक

author img

By

Published : Feb 11, 2022, 12:44 PM IST

Updated : Feb 11, 2022, 2:01 PM IST

भाजपाचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर ( Goa Dcm Chandrakant Kavalekar ) यांच्या पत्नीने बंड केले आहे. सावित्री कवळेकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला ( Savitri Kavalekar Independent Election ) आहे.

Savitri Kavalekar
Savitri Kavalekar

पणजी - राज्यात सध्याच्या घडीला भाजपाविरोधात अनेक जण स्वातंत्रपणे निवडणूक लढवीत ( Goa Assembly Election 2022 ) आहेत. मात्र, तिकीट न मिळाल्याने भाजपातील काही नाराजांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील एक मतदारसंघ म्हणजे सांगे.

अशी आहे लढत

सांगे मतदारसंघात खरी लढत होती ती भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी. पण, तिकीट न मिळाल्याने भाजपाचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता थेट लढत होणार आहे ती काँग्रेसचे प्रसाद गावकर ( Congress Candidate Prasad Gaokar ), भाजपाचे सुभाष फळदेसाई ( Bjp Candidate Subhash Phaldesai ) आणि अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर (independent Candidate Savitri Kavalekar ) यांच्यात. 2017 साली अपक्ष निवडणूक लढणाऱ्या प्रसाद गावकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. त्यांना आव्हान आहे ते भाजपाचे सुभाष फळदेसाई यांचे. पण, अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांच्या उमेदवारीने ही लढाई आता अधिकच रंगतदार होणार आहे.

सावित्री कवळेकर, प्रसाद गावकर यांची प्रतिक्रिया

माझ्या अस्तित्वासाठी मी लढतेय

भाजपाने तिकीट नाकारले म्हणून सावित्री कवलेकर या अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. याबाबत त्यांनी म्हटलं की, निवडणूक लढवणे हा माझा हक्क आहे. येथे कोणताही पती, पत्नी किंवा घराणेशाही असा वाद नाही. मी माझ्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

माझा विजय निश्चित

2017 साली अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रसाद गावकर यंदा प्रथमच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे त्यांची स्वतःची असलेली मते व त्यात काँग्रेसची असलेली मते आणि मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर गावकर यांचे सध्या तरी पारडे जड आहे. त्यामुळेच आपला विजय निश्चितच असल्याचे प्रसाद गावकर यांनी म्हटले.

हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : जवाहरलाल नेहरु यांनी गोव्याच्या मुक्तीकरिता सैनिक पाठविण्यास नकार दिला होता - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Last Updated : Feb 11, 2022, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.