ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : निवडणूक आयोगाने रोखला काँग्रेस उमेदवार प्रचार; मायकल लोबो म्हणाले, "हे भाजपाचे..." - काँग्रेस उमेदवार राजेश फलदेसाई गोवा

गोव्यात भाजपा उमेदवाराचा ( Goa Assembly Election 2022 ) प्रचार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रोखला आहे. आयोगाच्या नियमांचा भंग केल्याचे भरारी पथकाने सांगितले. तर हे भाजपाचे कारस्थान असल्याचा आरोप मायकल लोबो यांनी केला आहे.

Goa Assembly Election 2022 :
Goa Assembly Election 2022 :
author img

By

Published : Jan 15, 2022, 5:05 PM IST

Updated : Jan 15, 2022, 5:27 PM IST

गोवा - गोव्यात निवडणुकीचे पडघम वाजले ( Goa Assembly Election 2022 ) आहेत. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात आता प्रचारासाठी निवडणूक आयोगाने लावून दिलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी भरारी पथकाने मायकल लोबो आणि काँग्रेस उमेदवार राजेश फलदेसाई ( Goa Congress Candidate Rajesh Faldesai ) यांचा प्रचार ( Election Commission Stop Rally Congress Goa ) रोखला आहे. तसेच, त्यांना समजही देण्यात आली आहे.

कुंभारजुवे मतदारसंघात भरारी पथकाची कारवाई

भाजपाचे माजी मंत्री असलेले मायकल लोबो ( Congress Michael Lobo ) यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. निवडणूक घोषित झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ते काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करत आहे. लोबो कुंभारजुवे मतदारसंघात काँग्रेस उमेदवार राजेश फलदेसाई ( Goa Congress Candidate Rajesh Faldesai ) यांचा प्रचार करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी अतिरिक्त गर्दी जमावली. यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आक्षेप घेत अर्ध्यात प्रचार रोखला आहे. उमेदवाराने आचारसंहिता नियमाचा भंग केल्याचे सांगत संबंधितांना समजही भरारी पथकाने दिला आहे.

हे भाजपाचे कारस्थान

मायकल लोबो प्रसारमाध्यमांना संवाद साधताना

आपण भाजपातून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपा प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडविण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्यामुळे भाजपाच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आपण या मतदारसंघात प्रचारासाठी येणार असल्याचे भाजपाला समजले होते. तेव्हा मला रोखण्यासाठी भाजपने माझ्या मागे भरारी पथक लावले असून, मला या ठिकाणी प्रचार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मायकल लोबो यांनी भाजपावर केला.

हेही वाचा - Goa Election : तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? - उत्पल पर्रीकर

Last Updated : Jan 15, 2022, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.