ETV Bharat / city

अंमलीपदार्थांचा वाढता पसारा गोव्यासाठी धोकादायक - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात अंमलीपदार्थ शाळा व महाविद्यालयापर्यंत पोहचले आहेत. त्याला सरकारने आळा घालावा अशी मागणी सांत आंद्रेचे भाजपचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Jul 16, 2019, 5:52 PM IST

पणजी - गोवा विधानसभेत मंगळवारी दुसऱ्या दिवशी अंमलीपदार्थांचा वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त करण्यात आली. यासाठी येत्या सहा महिन्यात दक्षिण गोव्यातील व वेर्णा येथे असलेल्या नार्कोटीक प्रयोगशाळेत चार नव्या चाचण्या करण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

सांत आंद्रेचे भाजपचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी तारांकित प्रश्नाच्या वेळेस हा मुद्दा उपस्थित केला. राज्यात अंमलीपदार्थ शाळा व महाविद्यालयापर्यंत पोहचले आहेत. त्याला सरकारने आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की अंमलीपदार्थ खरेदी - विक्री करणाऱ्यांविरोधात गोवा पोलीस जोरदार कारवाई करत आहे. तसेच या प्रकरणात 99.75 टक्के लोकांना अटकही करण्यात आली आहे. तर 2900 हून अधिक तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस गंभीर आहेत. परंतु, पालकांनी संवेदनशील होण्याची गरज आहे. गोमंतकियांनी जागरूक रहावे. यासाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

1300 पदे लवकरच भरणार - मुख्यमंत्री सावंत
पोलीस दलातील रिक्त असलेली 1300 पदे लवकरच भरली जाणार आहेत. यासाठी महिनाभरात जाहिरात निघण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. महिला पोलीसांची आवश्यक त्या प्रमाणात भरती होत नसल्याने निकषात थोडी सवलत दिली जाणार आहे. तसेच आवश्यक वाहनांची खरेदी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

Intro:पणजी : गोवा विधानसभेत आज दुसऱ्या दिवशी अमलीपदार्थांचा वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त करण्यात आली. यासाठी येत्या सहा महिन्यात दक्षिण गोव्यातील व वेर्णा येथे असलेल्या नार्कोटीक प्रयोगशाळेत चार नव्या चाचण्या करण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

Body:सांत आंद्रेचे भाजपचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी तारांकित प्रश्नाच्या वेळेस राज्यात अमलीपदार्थ शाळामहाविद्यालयापर्यंत पोहचले आहेत. त्याला सरकारने आळा घालावा अशी मागणी केली होती.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, अमलीपदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांविरोधात गोवा पोलीस जोरदार कारवाई करत असून अशा प्रकरणात 99.75 टक्के लोकांना अटक करण्यात आली आहे. तर 2900 हून अधिक तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस गंभीर आहेत. परंतु, पालकांनी संवेदनशील होण्याची गरज आहे. गोमंतकियांनी जागरूक रहावे. यासाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.
1300 पदे लवकरच भरणार : मुख्यमंत्री
पोलिस दलातील रिक्त असलेली 1300 पदे लवकरच भरली जाणार आहेत. यासाठी महिनाभरात जाहिरात निघण्याची शक्यता आहे, असे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, महिला पोलिस आवश्यक त्या प्रमाणात भरती होत नसल्याने गोवा सरकारने याच्या निकषात थोडी सवलत दिली जाणार आहे. तसेच आवश्यक वाहनांची खरेदी केली जाईल. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.