पणजी - डॉ. प्रमोद सावंत सरकारचे ( Dr Pramod Sawant Government Department Allocation ) खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. बहुचर्चित असणाऱ्या खातेवाटपात अनेकांना धक्का, तर अनेकांना महत्त्वाची खाती मिळाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या डॉ. विश्वजित राणे ( Dr Vishvajit Rane ) यांना आरोग्य नगर विकास तसेच महिला व बालकल्याण खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे.
कोणाला कोणते खाते? - मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाचे गृह आणि अर्थखाते आपल्याकडे ठेवले असून डॉ. विश्वजित राणे यांना आरोग्य नगर विकास व नगर नियोजन यासोबत महिला व बालकल्याण तसेच वनखात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर बाबूश मोन्सेरात यांना महसूल कामगार व कचरा व्यवस्थापन पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. म्हविन यांना वाहतूक उद्योग पंचायत व शिष्टाचार खाते देण्यात आले आहे. रवी नाईक कृषी हस्तकला व नागरी पुरवठा सहकार खाते देण्यात आले आहे. निलेश काब्राल यांना सार्वजनिक बांधकाम पर्यावरण व कायदा खात्याचा पदभार सोपविण्यात आला. रोहन खवटे यांना पर्यटन माहिती तंत्रज्ञान खाते देण्यात आले, गोविंद गावडे यांना क्रीडा कला आणि सांस्कृतिक खात्याचा पदभार देण्यात आला आहे.
अध्याप तीन आमदारांचा शपथविधी बाकी - अध्याप तीन आमदारांचा शपथविधी बाकी असून यातील भाजपच्या दोन मंत्र्यांना तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या एका आमदाराला काही मंत्रिपद देण्यात येतील. यातील डॉ. विश्वजित राणे यांच्याकडून एखाद-दुसरं खातं तसेच डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या एखादं खातं या तीन आमदारांपैकी एकाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अध्याप तीन आमदारांचा मंत्रीपदाचा शपथविधी बाकी असून यातील गोमंतक पक्षाच्या सुदीन ढवळीकर यांना चांगली खाती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil Warns Voters : कोल्हापुरातील मतदारांची ईडी चौकशी होणार.. चंद्रकांत पाटलांचा इशारा