ETV Bharat / city

'हिलिंग ईज ब्युटीफुल'; 'जून'च्या दिग्दर्शकांचे मत - जून मराठी चित्रपट दिग्दर्शक इफ्फी सहभाग

पणजीमध्ये सध्या ५१वा भारतीय चित्रपट महोत्सव(इफ्फी) सुरू आहे. भारतीय पॅनोरमा विभागात 'जून' हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी पत्रकार परिषद घेतली.

iffi
इफ्फी
author img

By

Published : Jan 21, 2021, 12:45 PM IST

पणजी - 'हिलिंग ईज ब्युटीफुल'. जर तुमच्या मनाचा एखादा कोपरा खचलेला असेल, एखादा भाग बरा झाला पाहिजे असे असेल, तर ती प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे मुक्त व्हा आणि संवाद साधा. 'जून'च्या माध्यमातून प्रेक्षकांना हेच दाखवू इच्छितो. 51व्या भारतीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित केलेल्या 'जून' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी इफ्फीतील पत्रकार परिषदेत असे मत व्यक्त केले.

संभाषण अतिशय महत्त्वाचे -

दोन व्यक्तींमध्ये संपर्क आणि संवाद गरजेचा आहे. आमचा चित्रपट संभाषण करणाऱ्या लोकांबद्दल भाष्य करतो. बऱ्याचदा आपल्याला कोणाशी बोलायचे, आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करायच्या हे माहित नसते. आजच्या या युगात प्रत्येक व्यक्ती ही एका स्वतंत्र बेटाप्रमाणे झाली आहे. मात्र, वास्तविक पाहता आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात कोणाची तरी आवश्यकता आहे. आजची पिढी आणि परिस्थितीशी साधर्म्य दाखवणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सुहृद गोडबोले यांनी सांगितले.

सुरुवात करावी लागेल -

'जून' या चित्रपटाची टॅग लाईन ‘हिलिंग इज ब्युटीफुल’, अशी आहे. यामध्ये बरेच दृष्टीकोन आहेत. आपल्याला मदत आणि उपचार शोधण्याची गरज आहे. बर्‍याचदा आपण स्वतःच्याच प्रेमात आणि विद्ध्वंसात हरवून जातो. आपल्यातील अपराधी भावना दूर करण्यास आणि आपल्या आतील राक्षसाचा अंत करून बरे होण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कधीच घाबरू नये. यासाठी स्वत:लाच सुरुवात करावी लागेल, असेही गोडबोले म्हणाले.

'जून'मध्ये आम्ही अनेक विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, असे चित्रपटाचे दुसरे दिग्दर्शक वैभव खिस्ती यांनी सांगितले. ' चित्रपटाचा प्रत्येक सेकंद आनंद देणारा आहे. मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडते, अशी प्रतिक्रिया मुख्य अभिनेता सिद्धार्थ मेनन यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.