पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी राष्ट्रीय व राज्य पातळीवर वैद्यकिय सेवा व नागरी पुरवठा सेवा हाताळण्यासाठी सदर क्षेत्रांतील तज्ञ तसेच लष्कराचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या दोन कृती दलांची स्थापन करावी. त्यांच्याकडून कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी उपाय योजना राबवावी, अशी मागणी गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांना तसे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
काॅंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे ज्या लोकांना आर्थिक झळ बसेल, त्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच वैद्यकिय सुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली होती. त्याला पाठिंबा देताना कामत यांनी पंतप्रधान यांच्याकडे कृतीदलाची मागणी केली आहे. लष्कराचा कृतीदलात समावेश केल्याने शिस्त आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला मदत होईल. हे संकट अधिक उग्र होऊ शकते, हे विचारात घेत आताच योग्य व कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे.
हेही वाचा... #CORONAVIRUS : इटलीतील स्थिती सांगतोय मराठी तरुण...याची देही, याची डोळा
'जीवनावश्यक वस्तुंचा अखंडीतपणे पुरवठा करावा. गरीब व गरजवंताना मोफत वा सवलतीच्या दरात वस्तु मिळवुन देणे, यासाठी वेगळ्या कृतीदलाची गरज आहे. सरकारने या सुविधा आताच सुरू केल्यास नागरिक जास्त काळ बंद लागु केल्यास त्यास पाठिंबा व सहकार्य देतील. गोवा सरकारने जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सकाळी दुकाने उघडी ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु, लोकांनी अकारण गर्दी न करता, आपणास आवश्यक तेवढ्याच वस्तु खरेदी कराव्यात व कारण नसताना घरात साठवणूक करू नये. लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान राखावे व पोलीस व सरकारी कर्मचारी व इतरांना सहकार्य करावे' असेही कामत म्हणाले.
हेही वाचा... COVID19: 'सरकारने योग्य पावले उचललीत...' राज ठाकरेंकडून सरकारचे कौतुक
'आज संकटकाळी मुकी जनावरे, पक्षी तसेच झाडे यांची काळजी घेणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. जनावरांना अन्न देणे तसेच मोठ्या रहिवाशी सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी माळी न आल्यास आपल्या बगीच्यांतील झाडांना पाणी देणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी या संकटकाळी मदत करणे हेच पुण्यकर्म आहे. सरकारने तालुका पातळीवर वेळोवेळी आढावा घेऊन त्या संबंधीचे पत्रक जारी करावे, ज्यामुळे लोकांना माहिती मिळणे सोपे होईल' असे कामात यांनी म्हटले आहे.
लष्कराचा कृतीदलात समावेश केल्याने शिस्त व कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यास सरकारला मदत होईल. यापुढे हे संकट अधीक उग्र होऊ शकते याची जाणीव ठेवुन आताच योग्य व कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तुंचा अखंडीतपणे पुरवठा करणे व गरीब व गरजवंताना मोफत वा सवलतीच्या दरात सामान मिळवुन देणे यासाठी वेगळ्या कृतीदलाची गरज आहे. सरकारने या सुविधा आताच सुरू केल्यास लोक जास्त काळ बंद लागु केल्यास त्यास पाठिंबा व सहकार्य देतील, असे कामत यांनी म्हटले आहेत.
तसेच, गोवा सरकारने जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सकाळी दुकाने उघडी ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु, लोकांनी अकारण गर्दी न करता, आपणास आवश्यक तेवढ्याच वस्तु खरेदी कराव्यात व कारण नसताना घरात साठवणूक करू नये. लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान राखावे व पोलीस व सरकारी कर्मचारी व इतरांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा... मी घरी पुस्तक वाचत आहे....शरद पवारांची ट्वीटरवर माहिती