पणजी : राज्यात मराठी संस्कृतीला प्राधान्य देण्यासाठी अखिल भारतीय गोमंतक साहित्य सेवक मंडळाने 27 आणि 28 नोव्हेंबरला संत सोहीरोबनाथ शासकीय महाविद्यालयात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संत साहित्याचे गाढे अभासक सदानंद मोरे या संमेलनाचे उद्घाटन करणार असून खासदार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, आमदार दयानंद सोपटे ही राजकीय मंडळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. मात्र या कार्यक्रम पत्रिकेतून माजी मुख्यमंत्री आणि प्राध्यापक लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे वगळल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
गोमंतक मराठी साहित्य संमेलनातून पार्सेकरांना वगळल्याने वादंग - गोमंतक मराठी साहित्य संमेलन
गोमंतक साहित्य सेवा मंडळाच्या वतीने पेडणे येथे 27 आणि 28 नोव्हेंबरला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री आणि प्राध्यापक लक्ष्मीकांत पार्सेकर यांना वगळण्यात आले आहे.