ETV Bharat / city

Goa Election 2022 : गोव्यात काँग्रेसचे सत्तासंधान सलग तिसऱ्यांदा हुकले, सभापतींच्या पराभवाची परंपरा कायम - गोवा निवडणूक

निवडणुकीत गोव्यातील परंपरा कायम राहिली. प्रत्येक निवडणुकीमध्ये सभापतींचा पराभव हा निश्चित असतो. या निवडणुकीत देखील सभापतींचा पराभव झाला. आमदार व सभापती राजेश पाटणेकर यांचा पराभव डॉ.चंद्रकांत शेट्ये (अपक्ष) यांनी पराभव केला. पाटणेकर हे सभापती होण्याअगोदर प्रमोद सावंत हे सभापती होते. नंतर ते मुख्यमंत्री बनले.

Goa Election 2022
Goa Election 2022
author img

By

Published : Mar 11, 2022, 9:55 AM IST

Updated : Mar 11, 2022, 1:01 PM IST

पणजी - अंदाज, आडाखे, भाकिते आणि समीकरणे खोटी ठरवत भारतीय जनता पक्षाने 8 व्या विधानसभेत पन्नास टक्के जागा संपादन केल्या आहेत. तीन अपक्ष आमदारांसह 2 सदस्यीय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचाही पाठिंबा मिळाल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले असून काँग्रेसचे सत्तासंधान सलग तिसऱ्या निवडणुकीत हुकले आहे. दरम्यान या निवडणुकीत सभापतींच्या पराभवाची परंपरा कायम राहिली आहे.

मांद्रे, डिचोली, शिवोली, हळदोणे, केपे, मुरगाव हे भरवशाचे मतदारसंघ भाजपाने गमावले. मात्र, शेवटच्या क्षणी त्या पक्षाला नशिबाची साथ मिळाली. फोंडा मतदारसंघातून रवी नाईक हे मगोपचे केतन भाटीकर यांच्यावर अवघ्या 77 मतांची आघाडी घेत विजयी झाले आणि भाजपची आमदारसंख्या 20 वर पोहोचली. भाटीकर यांच्या पराभवामुळे मगोपचे बळ 2 आमदारांवर घसरले असून भाजपाकडे वाटाघाटी करण्याच्या मगोपच्या क्षमतेला धक्का पोहोचला आहे. मगोप (2), आदमी पक्ष (2), आरजी (1) आणि अपक्ष (3) असे भाजपा विरोधी बलाबल असले तरी 12 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला या सगळ्यांचे समाधान करून सरकार स्थापनेचा दावा करणे महादित्य ठरेल. त्यातच डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा पाठिंबा मिळवत भाजपाने विरोधकांवर आधीच कुरघोडी केली. सायंकाळी कुडतरीचे रेजिनॉल्ड लॉरेन्स आणि कुठ्ठाळीचे आंतोनियो फर्नांडिस यांनीही भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.

20 आमदारांपर्यंत अनपेक्षित झेप घेणाऱ्या भाजपाला मात्र अनेक मोहरे गमवावे लाागले आहेत. दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर, ग्लेन टिकलो, राजेश पाटणेकर, मिलिंद नाईक, चंद्रकांत कवळेकर, क्लाफासियो डायस, आंतोनिया फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, जयेश साळगावकर, मनोहर आजगावकर, विनोद पालयेकर, चर्चिल आलेमाव, दिपक पाऊसकर या आमदारांना पराभवाला सामारे जावे लागेल. मगोप पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यासह डिचोलीत नरेश सावळपान यांचा समावेश आहे.

सभापतींच्या पराभवाची परंपरा -

निवडणुकीत गोव्यातील परंपरा कायम राहिली. प्रत्येक निवडणुकीमध्ये सभापतींचा पराभव हा निश्चित असतो. या निवडणुकीत देखील सभापतींचा पराभव झाला. आमदार व सभापती राजेश पाटणेकर यांचा पराभव डॉ.चंद्रकांत शेट्ये (अपक्ष) यांनी पराभव केला. पाटणेकर हे सभापती होण्याअगोदर प्रमोद सावंत हे सभापती होते. नंतर ते मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रिपद स्वीकारुन अडीच वर्षे झाली तरी देखील मुख्यमंत्र्यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. हा सभापतीपदाचा इफेक्ट असल्याची चर्चा आहे. प्रतापसिंग राणे वगळता आतापर्यंत जवळपास सर्वच सभापतींचा पराभव झालेला आहे.

मगोप-तृणमूलचाही अपेक्षाभंग

भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले मायकल लोबो कळंगुटमधून विजयी झाले. तर कार्लुस आल्मेदा (वास्को-काँग्रेस) इजिदोर फर्नांडिस (काणकोण-अपक्ष) फिलीप नेरी रॉड्रिग्स (राष्ट्रवादी-वेेळ्ळी) विल्फ्रेड डिसा (नुवे-अपक्ष) एलिना साल्ढाणा (कुठ्ठाळी-आप) प्रविण झाट्ये (मये-मगोप) या भाजपमधून पक्षांतर करणाऱ्या मावळत्या विधानसभेच्या आमदारांनाही पराभवाचा झटका बसला. 6 ते 8 जागा मिळवून किंगमेकर बनू पाहणाऱ्या मगो-तृणमूलचाही अपेक्षाभंग झाला.

Last Updated : Mar 11, 2022, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.