पणजी - काँग्रेसच्या नेत्या आणि सरचिटणीस प्रियंका गांधी येत्या 10 डिसेंबर रोजी पहिल्यांदाच गोव्याला भेट देणार ( Priyanka Gandhi Coming Goa ) आहेत. प्रियंका गांधी गोव्यात आल्यानंतर गोव्यातील खान उद्योग सुरू करण्याचा मुद्दा नक्कीच उचलला जाणार असून संसदेत यासंदर्भात आवाज उठवला जाणार आहे. गोव्यातील भाजपा सरकार या मुद्द्यावर सपशेल अपयशी ठरले असून काँग्रेसच लोकांना रोजगार मिळवून देईल असा दावा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केला आहे. प्रियंका आपल्या भेटीत इंदिरा गांधी यांनी 1972 मध्ये उद्घाटन केलेल्या इमारतीलाही भेट देणार असल्याचे कामत यांनी सांगितले.
...तर लोकांना रोजगार मिळेल -
खान उद्योग पुन्हा सुरू करावा यासाठी नुकताच गोव्यातील एकवीस सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळविले आहेत. खाणकाम सुरू करण्यासाठी काँग्रेसने आता उघडपणे पाठिंबा दिला आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आठ खाणींचा लवकरच लिलाव करणार असल्याची माहिती दिली. मात्र आधीपासून सुरू असलेल्या खाणी तातडीने सुरू कराव्यात जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल अशी काँग्रेसची मागणी आहे.
प्रियांका गांधींच्या हस्ते फुटणार प्रचाराचा नारळ- दिगंबर कामत
प्रियंका गांधी गोव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि गोवा काँग्रेसचे अध्यक्ष दिगंबर कामत यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा - UP Police Beat Health Worker : असंवेदनशील! पोलिसांची कडेवर लेकरु घेतलेल्या बापाला काठीने मारहाण