ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : भाजपातून कॉंग्रेसमध्ये गेलेल्या लोबो यांच्या पत्नी अखेर शिवोली मतदारसंघातून तिकीट - मायकल लोबो पत्नी शिवोली मतदारसंघ तिकीट

शिवोली मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी लोबो भाजपा पक्षात आग्रही होते. मात्र, भाजपाने तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर लोबोंनी काँग्रेसची वाट धरली आणि अखेर काँग्रेसने ( Lobo Wife Get MLA Ticket In Shivoli Constituency ) त्यांची पत्नी व समर्थक उमेदवारांना तिकीट दिले आहे.

Michael lobo Shivoli constituency
Michael lobo Shivoli constituency
author img

By

Published : Jan 20, 2022, 3:58 PM IST

पणजी - आपल्या पत्नीला शिवोली मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी लोबो भाजपा पक्षात आग्रही होते. मात्र, भाजपाने तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर लोबोंनी काँग्रेसची वाट धरली आणि अखेर काँग्रेसने ( Lobo Wife Get MLA Ticket In Shivoli Constituency ) त्यांची पत्नी व समर्थक उमेदवारांना तिकीट दिले आहे.

लोबो, केदार नाईकांना काँग्रेसचे तिकीट -

मायकल लोबो यांनी आपल्या पत्नीसह आपल्या समर्थक उमेदवारांना तिकीट देण्याची मागणी भाजपाकडे केली होती. मात्र, भाजपाने नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या लोबो यांनी काँग्रेस पक्षाची वाट धरली. तेव्हाच त्यांनी बरदेश मतदारसंघातील सर्वच जागा निवडून आणण्याची रणनीती आखली होती. त्यानुसार त्यांनी काँग्रेसकडे आपल्या समर्थकांना तिकीट देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने त्यांची मागणी मान्य करत म्हापसा मतदारसंघातून सुधीर कांडोलकर, सालिगव मधून केदार नाईक आणि शिवोलिमधून लोबो त्यांची पत्नी दलीयाना लोबो यांना तिकीट दिले आहे.

...म्हणून एकत्र आलो - केदार नाईक

बारडेश तालुका हा गोव्यातील पर्यटन दृष्ट्या फार महत्वाचा तालुका आहे. कोविड काळात राज्याची प्रचंड हानी झाली आहे. सालिगाव मतदारसंघात पर्यटन, टॅक्सीचालक सामान्य नागरिक यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी 'बारदेष फॉर टूगेदर'च्या बॅनरखाली आपण काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे सालिगावचे उमेदवार केदार नाईक यांनी सांगितले. नाईक यांना कालच काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे.

जयेश साळगावकर यांना भाजपाची उमेदवारी

भाजपकडून जयेश साळगावकर यांचे नाव चर्चेत आहे. साळगावकर यांनी नुकताच आपल्या गोवा फॉरवर्डचा राजीनामा दिला होता. मात्र, स्सालगवाकर यांच्या राजीनाम्याने भाजपातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. त्याचा परिणाम म्हणून भाजपाचे केदार नाईक यांनी भाजपाला रामराम करून काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला होता.

हेही वाचा - Bawankule On Nana Patole : परमेश्वराने एक जीव नानांच्या रूपाने भूतलावर खोटं बोलण्यासाठीचं पाठवला- बावनकुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.