ETV Bharat / city

MLA Ravi Naik Join BJP : काँग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक करणार भाजपात प्रवेश

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आमदार रवी नाईक (Former Cheif Minister Will Join BJP) हे भाजपात प्रवेश करणार आहेत. शनिवारी किंवा रविवारी ते आमदारकीचा राजीनामा (MLA Ravi Naik Resign) देऊन भाजपाचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपात अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

author img

By

Published : Dec 3, 2021, 7:19 PM IST

Goa Assembly Election
Goa Assembly Election

पणजी - काँग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री आमदार रवी नाईक (Former Cheif Minister Of Goa Will Join BJP) हे भाजपात प्रवेश करणार आहेत. शनिवारी किंवा रविवारी ते आमदारकीचा राजीनामा (MLA Ravi Naik Resign) देऊन भाजपाचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपात अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आमदार रवी नाईक हे कॉंग्रेसच्या (Congress Leader Ravi Naik) महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असून ते फोंडयाचे (Founda MLA) आमदार आहेत.

जयेश साळगावकरांनीही केला भाजपात प्रवेश -

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar Joined BJP) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा (MLA Salgaonkar Resign) देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी गुरूवारी रात्री उशिरा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर (Assembly Speaker Rajesh Patenkar) यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. गोवा फोरवर्ड आणि काँग्रेसने (Goa Forword And Congress) नुकतीच दिल्लीत जाऊन आगामी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) एकत्र लढविण्यासाठी टीम गोवाची स्थापना केली होती. यावेळी गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश अनुपस्थित होते. त्याचवेळी त्यांच्या भाजपा प्रवेशाची राजकीय चर्चा सुरू झाली होती. अखेर बुधवारी रात्री उशिरा त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर यांच्याकडे सुपूर्द केला. साळगावकर हे मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. त्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यातूनच त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, साळगावकर यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्तपणे भेट घेतली होती. तेव्हाच साळगावकर यांना भाजपा प्रवेशाचे आमंत्रण देण्यात आले होते. अखेर बुधवारी त्यांनी राजीनामा देऊन पुढची राजकीय वाटचाल राष्ट्रीय पक्षातून करण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले.

हेही वाचा - Kangana Ranaut Apologizes : कंगना रणौतच्या कारला शेतकऱ्यांचा घेराव, अभिनेत्रीने मागितली माफी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.