पणजी ( गोवा ) - राज्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या युतीवर शिक्कामोर्तब ( Congress And Goa Forward Alliance ) करण्यात आले आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज (दि. 30) दिल्लीत राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भेट घेऊन युती संदर्भात अंतिम निर्णय घेऊन आगामी विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) 'टीम गोवा'च्या बॅनर खाली लढविण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गोव्यात सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली. विरोधी पक्ष काँग्रेसने स्थानिक गोवा फॉरवर्डच्या मदतीने आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि. 30) गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन युतीवर शिक्कामोर्तब केले. त्यांच्यासोबत अपक्ष आमदार प्रसाद गावकरही युतीत सामील झाले.
यापूर्वी प्रसाद गावकर यांनी तृणमुलचा झेंडा हातात घेतला होता. अचानक दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेऊन युतीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा - Congress Allegation on BJP Minister : भाजपा मंत्र्यांवर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा कॉंग्रेसचा आरोप