ETV Bharat / city

केंद्रीय गृहमंत्र्यांशी गोव्यातील कोविड स्थितीबाबत चर्चा - मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत - मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या बद्दल बातमी

केंद्रीय ग्रूहमंत्र्यांशी गोव्यातील कोविड स्थितीची चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यासाठीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पणजी
पणजी
author img

By

Published : Apr 21, 2021, 10:08 PM IST

पणजी - गोव्यातील कोविड स्थितीबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांना राज्यातील कोविड स्थिती आणि व्यवस्थापन याविषयी माहिती दिली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करण्यासाठी आज गोवा सचिवालयात बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना त्यांची दिल्ली भेट आणि राज्यातील स्थिती बाबत विचारले असता त्यांनी सविस्तर माहिती दिली.

डॉ. सावंत म्हणाले, लॉकडाऊन हा अंतिम पर्याय म्हणून पहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील कोविड स्थिती आणि सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती काल केंद्रीय ग्रुहमंत्री यांची भेट घेऊन दिली. दुसऱ्या लाटेमध्ये पन्नाशीच्या आतील लोक अधिक बाधित होत आहेत. त्यामुळे 18 वर्षांवरील सर्वांचे लसिकरण करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून गोव्यात कोविड रुग्ण अधिक आढळून येत आहेत. मृतांची संख्या वाढत आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, कोविड रुग्ण अधिक आढळून येत आहेत कारण चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. रुग्णाचा मृत्यू होतो आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे लोक अंतिम टप्प्यात रूग्णालयात दाखल होत आहेत. म्हणून सरकारची लोकांना विनंती आहे की, ज्यांना लक्षणे दिसत आहेत, त्यांनी तत्काळ चाचणी करून दवाखान्यात दाखल होऊन उपचार घ्यावेत. आज आपत्ती व्यवस्थापन समिती आणि आरोग्य समिती यांची बैठक सचिवालयात पार पडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.